शेती उत्पादक कंपनीची कामे -खरोखर आज शेकऱ्यांनी आत्मनिर्भर झालेच पाहिजे
शेती उत्पादक कंपनीची कामे उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग (एका ठिकाणी जमा करणे), हातळणी, विपणन (मार्केटिंग), विक्री, निर्यात – कंपनी सभासद सदस्य यांचे व्दारा, वस्तु किंवा सेवा आयात करुन निर्माण झालेल्या उत्पादनाचे. म्हणजेच कंपनी सभासद सदस्य यांनी उत्पादन केलेल्या किंवा कंपनीने त्यासाठी आयात केलेल्या अशा उत्पादनाचे उत्पादन, हार्वेस्टिंग, प्रोक्युरमेंट, ग्रेडिंग, पुलिंग, हातळणी, विपणन, विक्री आणि निर्यात करु शकतात. तसेच कंपनी यासर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या संस्थेकडून करुन घेवू शकतात. जर कंपनीला वाटते, कि, शेतक-यांना ३-४ महिने शेती वापरण्याचे भाडे म्हणुन २-३ हजार रुपये देखील द्यायचे (अर्थात हे कंपनी व्यवस्थापन ठरवणार आहे आणि कंपनी कडे किती खेळते भांडवल राहते त्यावरुन ते ठरेल) तर कंपनी ते देवू शकते. शेतकरी जमिनीचे भाडे (ऐच्छिक), मालाचा चांगला दर, प्रक्रिया केल्यानंतर विक्री होवून मिळणारा नफा, प्रक्रिया केंद्रात गावातील तरुणांना रोजगार, विक्रीसाठी रोजगार, तसेच वाहतुकीचा रोजगार हे सर्व फायदे मिळवू शकतात. प्रक्रिया उद्योगाची सब्सिडी, बँकेकडून कर्ज तसेच इतर फा...