Posts

Showing posts from October, 2020

बंजारा समाजाचे धर्मगुरु रामरावबापू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली

Image
बंजारा समाजाचे धर्मगुरु रामरावबापू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली  दि. 31: संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु, आदरणीय रामरावबापू महाराज यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आदरणीय डॉ. रामरावबापू महाराजांनी केवळ बंजारा समाजाच्याच नव्हे तर, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केलं. अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनाची चळवळ उभारली. व्यसनमुक्तीसाठी लढा दिला. सामाजिक सुधारणा व मानवतेच्या कल्याणाला वाहून घेतलेलं, संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढं घेऊन जाणारं, ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांचं निधन ही देशाच्या सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, मानवतावादी चळवळीची मोठी हानी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.   उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वाशिम जिल्ह्यातील श्रीपोहरादेवी संस्थानचे प्रमुख असलेल्या धर्मगुरु आदरणीय डॉ. रामरावबापू महाराजांनी संपूर्ण जीवनभर बंजारा बांधवांच्या आणि मानवतेच्...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट                                                                                            (दि. ३१ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.) जिल्ह्यात आणखी १९ कोरोना बाधित; २५ जणांना डिस्चार्ज काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील समर्थनगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, सेक्युरा हॉस्पिटल परिसरातील १, मसोला खु. येथील १, मंगरूळपीर शहरातील बायपास रोड परिसरातील १, मालेगाव शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, वसारी येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, भरजहांगीर येथील ६, मांगुळझनक येथील १, कारंजा लाड शहरातील नवीन भारत नगर येथील १, दफानीपुरा येथील १, वाणीपुरा येथील १, लोहारा येथील १, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ...

तपस्वी डॉ. रामराव महाराज यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली

Image
 तपस्वी डॉ. रामराव महाराज यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली  वाशिम दि. ३१ : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरु, आदरणीय रामराव महाराज यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आदरणीय डॉ. रामराव महाराज यांनी सामाजिक सुधारणा, समाज प्रबोधनासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी म्हटले आहे. प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करून अनिष्ट प्रथा, रूढी बंद करण्याचे काम परमपूज्य डॉ. रामराव महाराज यांनी केले. समाजाने व्यसनापासून दूर राहावे, शिक्षित व्हावे, यासाठी ते आग्रही होते. त्यांनी दिलेली शिकवण आणि दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी म्हटले आहे.

स्टेट -बँक आरसेटी प्रशिक्षण समारोप

Image
  स्टेट -बँक  आरसेटी प्रशिक्षण  समारोप     वाशिम -ग्रामीण  भागातील  युवक  युवतीना  स्वयंरोजगार  प्रशिक्षण  देणाऱ्या  स्टेट  बँक  ग्रामीण  स्वयंरोजगार  प्रशिक्षण  संस्थाच्या  वतीने  वाशिम  तालुक्यातील  पांडवउमरा या  गावी  उद्योजकता विकास  कार्यक्रम प्रशिक्षणाचे आयोजन  करण्यात  आले  होते  त्या  प्रशिक्षणाचा  समारोप दि. २६ ऑक्टोबर  रोजी  करण्यात  आला.    स्टेट बँक  आरसेटीच्या  ग्रामीण  भागातील  युवक  युवतीसाठी  मोफत  प्रशिक्षण देण्यात  येतात अशाप्रकारचे  प्रशिक्षण बचत  गटातील  महिलांना  सुद्धा  दिले  जाते पांडवउमरा ता  वाशिम येथे दि. २१ऑक्टोबर ते  २६ऑक्टोबर  या  ६ दिवस  कालावधी  मध्ये उद्योजकता  विकास  कार्यक्रम  प्रशिक्षणाचे  आयोजन  करण्यात  आले  होते. या  प्रशिक्षणामध्ये एकूण...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम   जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. ३० ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.) जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; २४ जणांना डिस्चार्ज काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील १, समता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणची १, कोकलगाव येथील १, अनसिंग येथील १, फाळेगाव येथील १, रिसोड तालुक्यातील चिंचाबापेन येथील १, मसला येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २४ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या १ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे. कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ५६८४ ऍक्टिव्ह – ४४६ डिस्चार्ज – ५०९७ मृत्यू – १४० (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

इंडियन ऑइल तर्फे देशभरासाठी एकच इंडेन रिफील नोंदणी क्रमांक जारी

Image
  इंडियन ऑइल तर्फे देशभरासाठी एकच इंडेन रिफील नोंदणी क्रमांक जारी मुंबई, दि. 29 : सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइल तर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीसाठी एक कॉमन नंबर जारी केला आहे. आता ग्राहक 7718955555 या क्रमांकावर गॅस सिलिंडरची नोंदणी करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24x7 उपलब्ध असेल.या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर नोंदणी करता येऊ शकेल. ग्राहकांसाठी ही मोठीच सोय झाली असून इंडेन LPG रिफील सिलिंडर नोंदणी करणे आता अधिक सोपे आणि सोयीचे झाले आहे. ग्राहक कोणत्याही राज्यात किंवा टेलिकॉम सर्कलमध्ये असले तरी त्यांचा इंडेन रिफील नोंदणी क्रमांक हा तोच राहणार आहे.सध्या अस्तित्वात असलेली वेग-वेगळ्या टेलिकॉम सर्कलसाठी वेगळ्या इंडेन रिफील नोंदणी क्रमांकाची योजना 31.10.2020 च्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी LPG रिफील नोंदणीसाठी एकच कॉमन क्रमांक 7718955555 हा असेल.ग्राहक केवळ त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून इंडेन LPG रिफील बुक करू शकतात. LPG रिफील बुक करण्याची सुधारित पद्धती आणि मोबाईल नो...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम सर्वांपर्यंत ऑनलाईन पोहोचविणार

Image
  विधानभवन मुंबई येथे उच्चस्तरीय बैठकीत निर्णय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम सर्वांपर्यंत ऑनलाईन पोहोचविणार मुंबई, दि 29 : भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातून तसेच जगभरातून अनुयायी 6 डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमी येथे दरवर्षी अभिवादनासाठी उपस्थित राहतात. यावर्षी कोरोना महामारीचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून केवळ शासकीय मानवंदना देण्याच्या समन्वय समितीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात यावा. यासंदर्भात शक्य तितक्या लवकर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शासन निर्णय जाहीर व्हावा जेणेकरून सर्वांना पूर्वसूचना प्राप्त होईल. शासकीय अभिवादन सोहळा, हॅलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि सर्व समाजमाध्यमांतून ऑनलाईन प्रक्षेपण करण्यासंदर्भात शासन आणि महानगरपालिका स्तरावर उचित निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.   भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 ...

कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Image
कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मुंबई दि. 29 – राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून आपण त्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, शासन कांदा उत्पादक  शेतकऱ्यांच्या  पाठीशी   ठामपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी कांदा व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसंदर्भात केंद्र सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे  पाठपुरावा करून ही मर्यादा वाढवून घेण्याचा शासन प्रयत्न करील,  कांदा व्यापाऱ्यांनी राज्यात कांदा लिलाव सुरु  करावेत असे आवाहनही केले.   महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी  संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या त्यावेळी ते बोलत होते यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघट...

महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

Image
  महाराष्ट्रात ‘ मिशन बिगीन अगेन ’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार मुंबई, दि. २९ : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.   परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या-ज्या गोष्टींसाठी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे, त्या कायम राहतील.

६१ गावांमध्ये सुरु होणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ · ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Image
  ६१ गावांमध्ये सुरु होणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ·           ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम ,  दि. २९ :  केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नस कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकापर्यंत शासकिय ,  निमशासकिय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरीता जिल्ह्यातील ६१ रिक्त ठिकाणाकरीता २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. अर्जांचा नमुना ,  आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  www.washim.nic.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पात्र, अपात्र उमेदवारांची यादी, निवड यादी तसेच निवड प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.  प्रती अर्जाची फी १०० रुपये रा...

शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या उकलून सुकवाव्यात - कृषि विभागाचे आवाहन

Image
  शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या उकलून सुकवाव्यात            कृषि विभागाचे आवाहन ·    वातावरण निरभ्र झाल्याने पावसाची शक्यता फार कमी वाशिम ,  दि. २९ :  ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस सुरु झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापणी करण्यात आलेले सोयाबीन शेतात उंच जागेवर सुड्याच्या स्वरुपात ताडपत्रीसह झाकून ठेवलेले आहे. सद्यस्थितीत वातावरण निरभ्र असून पाऊस येण्याची शक्यता फार कमी आहे. सुड्यामध्ये आर्द्रता असल्याने सुड्या लागण्याची (कुजून) शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सुड्या पूर्णपणे उकलून सोयाबीन ताडपत्रीवर चांगले सुकवून घ्यावे व मळणी करून सोयाबीन पुन्हा सुकवून घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. काही शेतकऱ्यांना आताच मळणी करणे शक्य नसल्यास, त्यांनी सुड्या पूर्णपणे ताडपत्रीवर पसरवून सुकवाव्यात, त्यानंतर पुन्हा सुडी लावून सोयीनुसार मळणी करून घ्यावी. सोयाबीन चांगले सुकवून स्पायरल चाळणी करावी. सुड्या तशाच झाकून ठेवल्याने आर्द्रतेमुळे सुड्यामध्ये काही ठिकाणी कुजून सोयाबीनची प्रत खरब होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शे...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम  जिल्ह्यातील  आजचा  कोरोना  अलर्ट  (दि. २९ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी २९ कोरोना बाधित; २६ जणांना डिस्चार्ज   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील २, जुनी आययुडीपी येथील १, पोस्ट ऑफिस जवळील २, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील वडप येथील १, पांगरी कुटे येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, संताजी नगर येथील १, महालक्ष्मी विहार परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, फाळेगाव येथील ३, मानोली येथील २, शाहपूर येथील १, तऱ्हाळा येथील २, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील २, मोठे राम मंदिर परिसरातील ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.   दरम्यान ,  जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या २ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ५६७६ ऍक्टिव्ह  –  ४६३ डिस्चार्ज  –  ५०७३ मृत्यू  –  १...

मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठ स्थापन करा – राज्य सरकारची सरन्यायाधीशांना दुसऱ्यांदा विनंती

Image
  मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठ स्थापन करा – राज्य सरकारची सरन्यायाधीशांना दुसऱ्यांदा विनंती मुंबई, दि.२८ :  मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने घटनापीठाची स्थापना करून मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेशाची सुनावणी करावी, अशी दुसरी लेखी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना केली आहे.   मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कालच जालना येथे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अर्ज करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी राज्य शासनाचे वकील अॅड. सचिन पाटील यांनी हा अर्ज सादर केला. या अर्जामध्ये ‘एसईबीसी’ आरक्षणासंदर्भातील ९ सप्टेंबर रोजीचा अंतरिम आदेश तातडीने मागे घेण्याची आवश्यकता असल्याचे विषद करण्यात आले आहे.   सर्वोच्च न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे राज्य शासनाच्या अनेक नोकरी भरती प्रक्रिया व विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाल्या असून, हजारो विद्यार्थी व उमेदवारांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे प्रकरण तातडीने घटनापिठासमोर सुनावणीस घेण्यात यावे, असे राज...

महाराष्ट्रातील १०० कुंभार कुटुंबांना ‘इलेक्ट्रिक चाके’ प्रदान

Image
महाराष्ट्रातील १०० कुंभार कुटुंबांना ‘इलेक्ट्रिक चाके’ प्रदान  नवी   दिल्ली ,  दि.  28 :  खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तीकरण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील 100 कुंभार कुटुंबांना आज इलेक्ट्रिक चाके प्रदान करण्यात आली.   केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने देशातील कुंभारांना सक्षम बनविण्यासाठी ‘कुंभार सशक्तीकरण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील दहा तर परभणी जिल्ह्यातील पाच गावातील 100 कुंभारांना प्रशिक्षण देण्यात आले. आज केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कुंभारांना दूरदृष्य प्रणालीद्वारे इलेक्ट्रीक चाके प्रदान करण्यात आली. खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना  यावेळी उपस्थित होते.   देशातील कुंभारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर सुरू करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम असल्याचे केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रासह देशाच्या अन्य दुर...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २८ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी ०८ कोरोना बाधित; ३२ जणांना डिस्चार्ज   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, रिसोड शहरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.   दरम्यान ,  जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३२ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या १ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ५६४७ ऍक्टिव्ह  –  ४६२ डिस्चार्ज  –  ५०४७ मृत्यू  –  १३७   (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण

Image
  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण वाशिम ,  दि. २८ :  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या तीन लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते आज, २८ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, ‘नाबार्ड’चे जिल्हा महाव्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, कौशल्य विकास अधिकारी जी. पी. चिमणकर, महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमोल मरेवाड, आयशर ट्रॅक्टरचे डीलर रमेश वानखेडे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांचे हस्ते वाशिम येथील मधुकर जाधव, रिसोड तालुक्यातील सवड येथील निलेश काकडे, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील प्रवीण शिंदे या तीन शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.  म्हणाले, अण्णासाहेब पा...