बंजारा समाजाचे धर्मगुरु रामरावबापू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली
बंजारा समाजाचे धर्मगुरु रामरावबापू महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली
दि. 31: संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु, आदरणीय रामरावबापू महाराज यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आदरणीय डॉ. रामरावबापू महाराजांनी केवळ बंजारा समाजाच्याच नव्हे तर, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केलं. अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनाची चळवळ उभारली. व्यसनमुक्तीसाठी लढा दिला. सामाजिक सुधारणा व मानवतेच्या कल्याणाला वाहून घेतलेलं, संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढं घेऊन जाणारं, ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांचं निधन ही देशाच्या सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, मानवतावादी चळवळीची मोठी हानी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वाशिम जिल्ह्यातील श्रीपोहरादेवी संस्थानचे प्रमुख असलेल्या धर्मगुरु आदरणीय डॉ. रामरावबापू महाराजांनी संपूर्ण जीवनभर बंजारा बांधवांच्या आणि मानवतेच्या उन्नतीसाठी कार्य केले. सामाजिक व सुधारणावादी कार्याचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनानं केवळ बंजारा बांधवांचंच नव्हे तर, सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून योगदान देणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचं मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME