तपस्वी डॉ. रामराव महाराज यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली

 तपस्वी डॉ. रामराव महाराज यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली 











वाशिम दि. ३१ : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरु, आदरणीय रामराव महाराज यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आदरणीय डॉ. रामराव महाराज यांनी सामाजिक सुधारणा, समाज प्रबोधनासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांनी म्हटले आहे.
प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करून अनिष्ट प्रथा, रूढी बंद करण्याचे काम परमपूज्य डॉ. रामराव महाराज यांनी केले. समाजाने व्यसनापासून दूर राहावे, शिक्षित व्हावे, यासाठी ते आग्रही होते. त्यांनी दिलेली शिकवण आणि दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू