शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या उकलून सुकवाव्यात - कृषि विभागाचे आवाहन

 शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या उकलून सुकवाव्यात 
         कृषि विभागाचे आवाहन
·  वातावरण निरभ्र झाल्याने पावसाची शक्यता फार कमी



वाशिमदि. २९ : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस सुरु झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापणी करण्यात आलेले सोयाबीन शेतात उंच जागेवर सुड्याच्या स्वरुपात ताडपत्रीसह झाकून ठेवलेले आहे. सद्यस्थितीत वातावरण निरभ्र असून पाऊस येण्याची शक्यता फार कमी आहे. सुड्यामध्ये आर्द्रता असल्याने सुड्या लागण्याची (कुजून) शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सुड्या पूर्णपणे उकलून सोयाबीन ताडपत्रीवर चांगले सुकवून घ्यावे व मळणी करून सोयाबीन पुन्हा सुकवून घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
काही शेतकऱ्यांना आताच मळणी करणे शक्य नसल्यास, त्यांनी सुड्या पूर्णपणे ताडपत्रीवर पसरवून सुकवाव्यात, त्यानंतर पुन्हा सुडी लावून सोयीनुसार मळणी करून घ्यावी. सोयाबीन चांगले सुकवून स्पायरल चाळणी करावी. सुड्या तशाच झाकून ठेवल्याने आर्द्रतेमुळे सुड्यामध्ये काही ठिकाणी कुजून सोयाबीनची प्रत खरब होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुड्या पूर्णपणे उकलून ताडपत्रीवर सोयाबीन सुकवून घ्यावे व होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू