स्टेट -बँक आरसेटी प्रशिक्षण समारोप
स्टेट -बँक आरसेटी प्रशिक्षण समारोप
वाशिम -ग्रामीण भागातील युवक युवतीना स्वयंरोजगार प्रशिक्षण देणाऱ्या स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाच्या वतीने वाशिम तालुक्यातील पांडवउमरा या गावी उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रशिक्षणाचा समारोप दि. २६ ऑक्टोबर रोजी करण्यात आला.
स्टेट बँक आरसेटीच्या ग्रामीण भागातील युवक युवतीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येतात अशाप्रकारचे प्रशिक्षण बचत गटातील महिलांना सुद्धा दिले जाते पांडवउमरा ता वाशिम येथे दि. २१ऑक्टोबर ते २६ऑक्टोबर या ६ दिवस कालावधी मध्ये उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये एकूण ३५महिलांनी सहभाग घेतला होता सदर प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
आरसेटी चे संचालक श्री चंदन गवई सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल लोखंडे मॅनेजर माविम यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील ज्यास्तीत ज्यास्त पुरुष व महिलांनी आरसेटी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन आरसेटी संचालक चंदन गवई यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आशिष राउत सहाय्यक आरसेटी यांनी केले कार्यक्रमाला आरसेटी कर्मचारी व प्रशिक्षन लाभार्थी उपस्थित होते
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME