राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण
राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ एचडीएफसी बँक आणि फ्यूएल संस्थेचा पुढाकार मुंबई, दि. २२ : एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राज्यातील १ हजार ८०० तरुणांना कृत्रीम बुद्धीमत्ता (आर्टीफिशीयल इंटेलिजन्स) आणि डिजिटल मार्केटींगचे ट्रेनिंग आणि करिअर समुपदेशन देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मंत्रालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. एचडीएफसी बँकेने महाराष्ट्रातील तरुणांसाठी फ्यूचर स्किल्स इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केला आहे. बँकेच्या सीएसआर निधीमधून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी फ्यूएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाझींग लाइव्ह्ज) ही स्वयंसेवी संस्था विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन, प्रशिक्षण आणि जॉब प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन करणार आहे. या उपक्रमाद्वारे एचडीएफसी बँक महाराष्ट्रातील १ हजार ८०० पेक्षा जास्त तरुणांना करिअरविषयक सल्ला व कौशल्य प्रशिक्षण देईल. शिवाय ...

Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME