Posts

खादी उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
खादी उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती दि. 29 :   खादी पासून तयार होणाऱ्या कपड्यांचा दर्जा उत्तम असतो. त्यामुळे खादी उद्योगाला चालना मिळणे आवश्यक आहे, या उद्योगाला चालना मिळाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल, असे मत पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले. येथील मालवीय चौकातील खादी ग्रामोद्योग कार्यालय, कस्तुरबा सोलर खादी महिला समिती व ग्रीन फॅबच्या 'कुटीर'  केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाला ताफजुल हसंजोइ, शेहनांज हसंजोई, डॉ. इंसिया हसंजोई, मुफ्फदल हसंजोई आदी उपस्थित होते. या कुटीर खादी केंद्रात खादीचे कापड, तयार कपडे आणि खादीपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. कस्तुरबा सोलर खादी महिला गटाने तयार केलेले खादीचे कपडे आणि आकर्षक वस्तूंची श्रीमती ठाकूर यांनी पाहणी केली.

आरोग्याच्या भक्कम सुविधेमुळे दुसऱ्या लाटेतून ग्रामीण भागाला सावरता आले – पालकमंत्री अशोक चव्हाण

Image
आरोग्याच्या भक्कम सुविधेमुळे दुसऱ्या लाटेतून ग्रामीण भागाला सावरता आले – पालकमंत्री अशोक चव्हाण खुजडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण   नांदेड   दि. 29 :- कोरोनाच्या कालावधीत ग्रामीण भागातील जनतेला अनेक आव्हानाला तोंड द्यावे लागले. आरोग्याच्या सेवा-सुविधा त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्नांची शर्थ केली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत आपण वेळीच आरोग्याच्या सर्व सेवा-सुविधा प्रभावीपणे पोहोचविल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून ग्रामीण भागाला सावरु शकल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मुदखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खुजडा येथील आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. चिलपिंपरी ते महाटी रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण व पोचमार्गाचे भूमिपूजन, रोहिपिंपळगाव-पिंपळकौ ठा-पांगरगाव रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या कार...

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोहयो व फलोत्पादनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

Image
कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोहयो व फलोत्पादनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे   नांदेड दि. 29 :-  ग्रामीण भागात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचा विकासही तेवढाच अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना दळणवळणाच्या किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मातोश्री पाणंद रस्ते विकासावर शासनाने भर दिला असून रोहयो व फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक सुलभ निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृह येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, रोहयो उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. शेततळयाच्या योजनेमध्ये पुर्वी असलेल्या त्रुटी आता दुर केल्या आहेत. शेततळ्याच्या अस्तरीकरणासह (पॉलिथीन) 5 लाख 34 हजार रुपयांचे...

प्रत्येक भारतीयाला तुमच्या कामगिरीचा अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
प्रत्येक भारतीयाला तुमच्या कामगिरीचा अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 'सुवर्णवेध' घेणाऱ्या अवनी लेखरासह विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन   मुंबई , दि. 28 :- टोकियो येथे सुरु असणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरुन अवनी लेखरा भारतासाठी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. त्याचबरोबर थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्यपदक तर भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझारियाने रौप्यपदक आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकले. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी भारतासाठी पदकांच्या विजयाची हंडी फोडणाऱ्या सर्व विजेत्या खेळाडूंचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्यासह अवनी लेखराने नवे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा प्रस्थापित केले. थाळीफे...

अल्पसंख्याक समुदायातील महिला बचतगटांना मिळणार २ लाख रुपयांचे कर्ज

Image
  अल्पसंख्याक समुदायातील महिला बचतगटांना  मिळणार २ लाख रुपयांचे कर्ज ·          मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची योजना वाशिम ,   दि. ३०  :   मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील महिला बचतगटांना २ लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेकरिता अर्ज व नाव नोंदणीसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे, असे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे. मुस्लीम, बौध्द, शीख, पारशी, ख्रिश्चन व जैन या अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या बचतगटांसाठी सूक्ष्म पतपुरवठा योजना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविली जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या मदतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा इतर संस्थांनी ...

पॅराऑलिम्पिकमध्ये भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकून रचला इतिहास – क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडून अभिनंदन

Image
  पॅराऑलिम्पिकमध्ये भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकून रचला इतिहास – क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडून अभिनंदन मुंबई दि. २९ :  भारताच्या भाविनाबेन पटेलने पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे कौतुकोद्गार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी काढले आहे. श्री.केदार म्हणाले, भाविनाबेन पटेल ह्या सामान्य कुटुंबातील असून कठोर परिश्रम घेऊन भाविनाने भारताला पहिलं पदक जिंकून दिले आहे. टेबल टेनिसमध्ये तिने अंतिम फेरी गाठली. पण सुवर्णपदकाने तिला हुलकावणी दिली. मात्र तिने रौप्यपदक जिंकलं आहे.  पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. भाविना यांनी रौप्यपदक जिंकत इतिहासही रचला. पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन

Image
  अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन पुणे , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 29 :   अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले. आठवड्याभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सरहद संस्थेच्यातीने आयोजित महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यासोबत येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी येथे संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षण संचालक धनराज माने, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष मालोजीराजे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, किरण साळी,...

मौजे भुर - पूर येथे शेतीशाळेची बांधावरील कार्यशाळा संपन्न

Image
  मौजे भुर - पूर येथे शेतीशाळेची बांधावरील कार्यशाळा संपन्न   तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगरूळपीर अंतर्गत शेलुबाजार मंडळातील मौजे भुर-पूर येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते या शेतीशाळेमध्ये शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक विजयता सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. कीटकनाशक फवारणी करताना चे प्रात्यक्षिक दाखवून शेतकरी बांधवांनी फवारणी करताना अंगरक्षक कपडे.पायात बुट, हातमोजे, नाकावरील मास्क,चष्मा इत्यादी साधनांचा वापर करावा. शक्यतो फवारणी ही सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असताना करावी. सोयाबीन पिकातील भेसळयुक्त  झाडे काढून टाकणे,  बुरशीनाशकाची वेळेवर फवारणी करणे तसेच ई  - पीक पाहणी हे ॲप प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये  डाऊनलोड करावे आणि त्या माध्यमातून आपला पीकपेरा नोंदवावा याबाबत माहिती सांगितली. या शेती शाळे करिता ए.टी.ठोंबरे कृषी सहाय्यक त्याचबरोबर आकाश देवळे, श्रीकृष्ण भगत' गोपाल देवळे, संतोष धनवटे, विठ्ठल चौगुले, ज्ञानदेव खाडे, शुभम देवळे, लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव भगत, विनोद खाडे, परसराम झळके, किसन मानकर, शंकर कोल्हे, सचिन खाडे, सहदेव...

‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
   ‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती   ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 28 :- महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाद्वारे राज्यात एक हजार कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच मॅग्नेट प्रकल्पांतर्गत  प्रत्येक जिल्ह्यात सुविधा केंद्र  उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमिपूजन बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार जळोची येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, प्रधान सचिव सहकार व पणन अनुप कुमार, पणन संचालक सतिश सोनी, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल प...

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर काळजी नको; आता येणार 'शासन आपल्या दारी' अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार  सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार   मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 28: कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.   घरी जाऊन घेण्यात येणार योजनांचे अर्ज या मिशननुसार गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी  क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये  वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शि...

जिल्ह्यात १२ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
जिल्ह्यात १२ सप्टेंबरपर्यंत   प्रतिबंधात्मक   आ देश   लागू वाशिम ,   दि. २८ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी ,   यासाठी २९ ऑगस्ट २०२१ रोजीचे ००.०१ वा ते १२ सप्टेंबर २०२१ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार जिल्ह्यात   प्रतिबंधात्मक   आदेश   यां नी लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे   आदेश   जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत. या कालावधीत शस्त्रे ,   सोटे ,   तलवारी ,   भाले ,   दं डे ,   बंदुका ,   सुरे ,   लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे ,   कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे ,   दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे ,   जमा करणे किंवा तयार करणे ,    व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे ,   वाद्य वाजविणे ,   किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपण...

ई-पीक पाहणी मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची कंझरा, शेलूबाजार येथील शेतकऱ्यांशी संवाद

Image
  ई-पीक पाहणी मोहिमेच्या अनुषंगाने  जिल्हाधिकाऱ्यांची कंझरा, शेलूबाजार येथील शेतकऱ्यांशी संवाद वाशिम ,   दि. २८ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक पेरणीबाबतची माहिती सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. याविषयी तलाठी, कृषि सहायक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना माहिती, प्रशिक्षण देवून पीक पेरणीविषयी नोंदणी शेतकऱ्यांकडून करून घेतली जात आहे. या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २७ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर तालुक्यातील कंझारा व शेलूबाजार येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मंगरूळपीरचे तहसीलदार नरसय्या कोंडागुरले, मंडळ अधिकारी दिलीप चौधरी, श्री. मनवर, तलाठी अमित इंगोले, श्री. पांडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद करून शकणार आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. शेतकरी प्रत्‍यक्ष शेतात जाऊन मोबाईल अॅपद्वारे पिकांचे...

पोलीस, वकील व न्यायाधीश क्षेत्रातील गुन्हेगारी नष्ट केली जाऊ शकते.-ऍड. आर. एन. कांबळे

Image
 

बहुजनांच्या नायकांची चळवळ योग्य होती-ऍड. आर. एन. कांबळे

Image
 

लोकराज्य धाडन प्रगतीला धाडलं -ऍड आर. एन. कांबळे

Image
 

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

Image
  ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास पुणे , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 27 :-   भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ राज्यातील भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या केंद्राचं काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन वेळेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेच्या ...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले

Image
  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून  परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले ·          ३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार वाशिम ,   दि. २७ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे ,  यासाठी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहे. विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ,  अकोला येथे उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज भरून कार्यालयास सादर करावे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या महाविद्यालयांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता ,  अटी व शर्ती याबाबतची माहिती प्रकल्प अधिकारी कार्यालय ,  अकोला येथील सूचना फलकावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७२४-२४२५०६८ या दूरध्वनी क्रमांक संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी वि...

देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातून चालना

Image
  देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातून चालना उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश स्टार्टअप्स-शासनामध्ये भागीदारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न – उद्योग मंत्री सुभाष देसाई मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. २७ :  देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात कॅन्सर स्क्रीनिंग, प्लॅस्टिकपासून दीर्घकालीन टिकणारे रस्ते बनविणे, फिशपॉन्डचे आधुनिकरण, एयर फिल्टरमार्फत इंधन बचत, पोल्ट्री व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित समारंभात गौरविण्यात आले. तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले. तर, स्टार...