अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले
· ३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
वाशिम, दि. २७ (युगनायक न्युज नेटवर्क) : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज भरून कार्यालयास सादर करावे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या महाविद्यालयांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती याबाबतची माहिती प्रकल्प अधिकारी कार्यालय, अकोला येथील सूचना फलकावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७२४-२४२५०६८ या दूरध्वनी क्रमांक संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME