पॅराऑलिम्पिकमध्ये भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकून रचला इतिहास – क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडून अभिनंदन
पॅराऑलिम्पिकमध्ये भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकून रचला इतिहास – क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडून अभिनंदन
मुंबईदि. २९ : भारताच्या भाविनाबेन पटेलने पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे कौतुकोद्गार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी काढले आहे.
श्री.केदार म्हणाले, भाविनाबेन पटेल ह्या सामान्य कुटुंबातील असून कठोर परिश्रम घेऊन भाविनाने भारताला पहिलं पदक जिंकून दिले आहे. टेबल टेनिसमध्ये तिने अंतिम फेरी गाठली. पण सुवर्णपदकाने तिला हुलकावणी दिली. मात्र तिने रौप्यपदक जिंकलं आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. भाविना यांनी रौप्यपदक जिंकत इतिहासही रचला. पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME