मौजे भुर - पूर येथे शेतीशाळेची बांधावरील कार्यशाळा संपन्न
मौजे भुर - पूर येथे शेतीशाळेची बांधावरील कार्यशाळा संपन्न
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगरूळपीर अंतर्गत शेलुबाजार मंडळातील मौजे भुर-पूर येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते या शेतीशाळेमध्ये शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक विजयता सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
कीटकनाशक फवारणी करताना चे प्रात्यक्षिक दाखवून शेतकरी बांधवांनी फवारणी करताना अंगरक्षक कपडे.पायात बुट, हातमोजे, नाकावरील मास्क,चष्मा इत्यादी साधनांचा वापर करावा. शक्यतो फवारणी ही सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असताना करावी. सोयाबीन पिकातील भेसळयुक्त झाडे काढून टाकणे, बुरशीनाशकाची वेळेवर फवारणी करणे तसेच ई - पीक पाहणी हे ॲप प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे आणि त्या माध्यमातून आपला पीकपेरा नोंदवावा याबाबत माहिती सांगितली.
या शेती शाळे करिता ए.टी.ठोंबरे कृषी सहाय्यक त्याचबरोबर आकाश देवळे, श्रीकृष्ण भगत' गोपाल देवळे, संतोष धनवटे, विठ्ठल चौगुले, ज्ञानदेव खाडे, शुभम देवळे, लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव भगत, विनोद खाडे, परसराम झळके, किसन मानकर, शंकर कोल्हे, सचिन खाडे, सहदेव भगत,नीलेश राऊत, पुरुषोत्तम देवळे हे शेतकरी बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME