खादी उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
खादी उद्योगातून रोजगाराची संधी उपलब्ध – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर अमरावती दि. 29 : खादी पासून तयार होणाऱ्या कपड्यांचा दर्जा उत्तम असतो. त्यामुळे खादी उद्योगाला चालना मिळणे आवश्यक आहे, या उद्योगाला चालना मिळाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल, असे मत पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले. येथील मालवीय चौकातील खादी ग्रामोद्योग कार्यालय, कस्तुरबा सोलर खादी महिला समिती व ग्रीन फॅबच्या 'कुटीर' केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाला ताफजुल हसंजोइ, शेहनांज हसंजोई, डॉ. इंसिया हसंजोई, मुफ्फदल हसंजोई आदी उपस्थित होते. या कुटीर खादी केंद्रात खादीचे कापड, तयार कपडे आणि खादीपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. कस्तुरबा सोलर खादी महिला गटाने तयार केलेले खादीचे कपडे आणि आकर्षक वस्तूंची श्रीमती ठाकूर यांनी पाहणी केली.