Posts

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

Image
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 23 : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली. यावेळी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील उपस्थित होते. नगरविकासमंत्री श्री.शिंदे म्हणाले, लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन सध्या अनुकूलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु आहे. कांजूरमार्गची 40 हेक्टरची जागा ओसाड आहे. भविष्यातील गरज ल...

भूजल पातळी वाढविण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
भूजल पातळी वाढविण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील भूजल स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. 22 : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत मोठी घसरण होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी तसेच मृद व जलसंधारण या तीन विभागांनी एकत्र मिळून काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी अटल भूजल योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज व घराघरात पाणी देण्यासाठी  शासन कटिबद्ध आहे. पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने जलधर पुनर्भरण योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. शिवकालीन पाणी साठवण योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भूजल पातळी वाढविण्यासाठी जनतेचा सहभाग घ्यावा, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. जनतेमध्ये जलसाक्षरता व जलजागृती निर्माण करावी असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्रपणे बैठक आयोजित ...

भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘नोगा’ ब्रँडची मूल्यसाखळी विकसित करा-कृषिमंत्री दादाजी भुसे

Image
भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘नोगा’ ब्रँडची मूल्यसाखळी विकसित करा-कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. 23 : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक गटांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याकरिता ‘नोगा’ ब्रँडखाली मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा. शहरी भागातील रहदारीच्या ठिकाणी व महामंडळाची मालकी असलेल्या जागेवर  ‘नोगा’  उत्पादनांची  विक्री स्थळे उभारावीत, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग महामंडळाच्या कामांचा आढावा कृषिमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कृषी उद्योग महामंडळाने ‘विकेल ते पिकेल’ या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन लोकाभिमुख व्हावे, असे आवाहन श्री.भुसे यांनी केले आहे. यावेळी महामंडळाच्या तांत्रिक व लेखाविषयक बाबींचा आढावा घेतानाच पारंपरिक रासायनिक खते, कीटकनाशके व कृषि अवजारांसोबतच नाविन्यपूर्ण उत्पादने, ट्रायकोडर्मा, फेरोमन सापळे यांचे उत्पादन करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, अशी सूचना श्री. भुसे यांनी केली. यावेळी महामंडळाची ...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट (दि. २३ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी १८ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील १, गोहोगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, मंगरुळपीर शहरातील शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पेडगाव येथील २, वार्डाफार्म येथील १, पांगरी येथील १, जांब येथील १, शहापूर येथील १, शिवनी येथील १, चिंचोळी येथील १, पिंप्री येथील १, कारंजा लाड शहरातील गायत्री नगर येथील १, रेणूका कॉलनी येथील १, शांतीनगर येथील १, धनज खु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर ४ रुग्णांची नोंद झाली आहे, तसेच ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला  कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६५६३ ऍक्टिव्ह – २४९ डिस्चार्ज – ६१६५ मृत्यू – १४८ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.

Image
  ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. * ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक * तालुकास्तरावर मदत कक्ष स्थापण्याच्या सूचना वाशिम,(जिमाका) दि.२२ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २३ डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात होत असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या संपूर्ण निवडणूक कालावधी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आज, २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजा व मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी राहूल जाधव यांच्यासह  सर्व तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ग्र...

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात एकूण २ लाख कोटींची गुंतवणूक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात एकूण २ लाख कोटींची गुंतवणूक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ६१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी; २ लाख ५३ हजार ८८० रोजगार उपलब्ध होणार मुंबई, दि.22 : उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन महाराष्ट्राने मागील वर्षभरात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.   सह्याद्री अतिथीगृह येथे 25 भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत 61 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 2 लाख 53 हजार 880  लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग ...

राज्यातील सहकारी मजूर संस्थांनी स्थानिकांना रोजगार देऊन कामात पारदर्शकता आणावी – सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

Image
राज्यातील सहकारी मजूर संस्थांनी स्थानिकांना रोजगार देऊन कामात पारदर्शकता आणावी – सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम मुंबई, दि. 22 : राज्यातील स्थानिक मजुरांना रोजगार मिळावा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या मजुरीमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी सहकारी मजूर संस्थांनी प्रयत्न करावेत. तसेच मजूर संस्थांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणावी, असे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले. राज्यातील मजूर संस्थांच्या कामकाजासंदर्भात डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. कदम बोलत होते. डॉ.कदम म्हणाले की, राज्यात नोंदणीकृत सहकारी मजूर संस्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून या संस्थेच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मजूर संस्थांनी आपल्या उपलब्ध कामांवर स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना योग्य वेतन मिळेल याची काळजी घ्यावी. सहकार विभागाने सहकारी मजूर संस्थांना कामे मिळण्यासाठी निश्चित कार्यप्रणाली तयार करून सर्व संस्थाचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, असेही डॉ.कदम यांनी...

कोल्हापुरी चप्पलांचा ब्रँड विकसित करून मोठ्या स्टोअरमध्ये विक्री करण्यासाठी अहवाल तयार करण्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांचे निर्देश

Image
कोल्हापुरी चप्पलांचा ब्रँड विकसित करून मोठ्या स्टोअरमध्ये विक्री करण्यासाठी अहवाल तयार करण्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांचे निर्देश मुंबई, दि. 22 : कोल्हापुरी चप्पला ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. या व्यवसायाच्या वाढीसाठी या चप्पलांचा ब्रँड विकसित करावा. मोठ्या स्टोअरमधून या चप्पलाच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्यांचे सहकार्य घेण्यासंदर्भात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासंदर्भात राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव सं.गी. पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण जाहीर उपस्थित होते. डॉ. कदम म्हणाले की, कोल्हापुरी चप्पला ह्या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. या व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी तसेच या चप्पलांची विक्री नावाजलेल्या दुकानांमधून व्हावी, यासाठी विविध कंपन्यांबरोबर भागीदारी क...

होतकरु तरुणांच्या स्टार्टअप्सना पेटंट मिळवून देण्यासाठी राज्य शासन करणार १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Image
होतकरु तरुणांच्या स्टार्टअप्सना पेटंट मिळवून देण्यासाठी राज्य शासन करणार १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती पहिल्या टप्प्यात १५० नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी करणार मदत मुंबई, दि. २२ : राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. तरुणांनी त्यांचे कौशल्य, गुणवत्ता आणि नवनवीन संकल्पना वापरुन विकसित केलेल्या स्टार्टअप्सना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी मोठा खर्च होतो. बरेच होतकरु स्टार्टअप्स या मोठ्या खर्चाअभावी त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुणवत्ता आणि नाविन्य असूनही पेटंटस् मिळवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर कौशल्यविकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात साधारण १२५ ते १५० स्टार्टअप्सना २ ते १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्य...

प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Image
प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्र्यांचा जिल्हा प्रशासनाशी संवाद मुंबई, दि. 22 : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अ...

इयत्ता 1 ली आणि इयत्ता 2 री आदिम विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश 10 फेब्रुवारी 2021 पर्यत अर्ज मागविले

  इयत्ता 1 ली आणि इयत्ता 2 री  आदिम विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश 10 फेब्रुवारी 2021 पर्यत अर्ज मागविले वाशिम ,   दि .   22 :  शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीत सन 2021-2022 या सत्रात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत मिळतील. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2021 ही आहे. इयत्ता 1 ली आणि इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे असतील. या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थी हा दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा. पालकाच्या वार्षिक उत्पन्नाची अट कमाल मर्यादा 1 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. इयत्...

उचित सेवांकुरमधील अंध मुलामुलींना खाद्य पदार्थ व हिवाळी रगचे वाटप

  उचित सेवांकुरमधील अंध मुलामुलींना खाद्य पदार्थ व हिवाळी रगचे वाटप वाशिम ,   दि .   22 :  वाशिम येथून जवळच असलेल्या केकतउमरा येथील चेतन उचितकर यांच्या उचित सेवांकुर ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या सर्व अंध मुलामुलींना वाशिमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिलीप देशमुख यांचे पुत्र दुर्गेश देशमूख यांच्या हस्ते खाद्य पदार्थ आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळी रगचे वाटप 21 डिसेंबर रोजी केकतउमरा येथील अंध आश्रमात करण्यात आले. दुर्गेश देशमुख यांनी आश्रमातील अंध मुला-मुलींशी संवाद साधून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात कुठलीही आवश्यकता पडल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अंध मुलांचे पालक श्री. पांडूरंग उचितकर यांनी अंध मुलाबद्दलची माहिती दिली. ही अंध मुले-मुली राज्यात विविध ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम तसेच शेतकंऱ्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम करून एक प्रकारे समाजकार्य करीत असल्याचे सांगितले. केकतउमरा येथील सेवांकुर अंध आश्रमात अंध मुला-मुलींचा विवाह करुन ते व्यवस्थिपणे आपला संसार करीत आहे. अशा विवाहित अंध जोडप्यांकडून आपण बोध घ्यावा. असे आवाहन जिल्हा विध...

पीएसआय परीक्षा २०१८ संभाव्य प्रतिक्षा यादी; मुदतवाढीसाठी प्रस्ताव एमपीएससीकडे सादर करावा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Image
पीएसआय परीक्षा २०१८ संभाव्य प्रतिक्षा यादी; मुदतवाढीसाठी प्रस्ताव एमपीएससीकडे सादर करावा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मुंबई, दि. 22 : मानवी दृष्टीकोनातून तसेच सध्याचे कोरोनाचे अभूतपूर्व संकट पाहता पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2018 च्या प्रतिक्षा यादीला मुदतवाढ देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. यासदंर्भात श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती गीता कुलकर्णी, गृह विभागाचे उपसचिव व्यंकटेश भट, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे देवेंद्र तावडे, सुनील शिनकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील नियमावलीनुसार परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक वर्ष या मुदतीत प्रतीक्षा यादी ग्राह्य धरली जाते. या कालावधीत पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर निवड यादीतील उमेदवार काही कारणाने हजर न झाल्याने किंवा अन्य कारणाने पदे रिक्त झाल्य...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट (दि. २२ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी ९ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिद्धी कॉलनी येथील २, काटा येथील २, रिसोड शहरातील सिव्हील लाईन येथील १, अनंत कॉलनी येथील १, भोकरखेडा येथील १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १, कारंजा लाड तालुक्यातील धनज खु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला  कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६५४१ ऍक्टिव्ह – २३८ डिस्चार्ज – ६१५४ मृत्यू – १४८ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे वाटप करताना काळजी घ्यावी – पालकमंत्री नितीन राऊत

Image
अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे वाटप करताना काळजी घ्यावी – पालकमंत्री नितीन राऊत नागपूर दि.   21   :  शहरातील अतिक्रमणधारी झोपडपट्टीवासियांना  जमिनीचे पट्टे वाटप करताना शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये शहरातील झोपडपट्टीवासियांना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक  उपस्थित होते. बैठकीला आमदार नागो गाणार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, प्रफुल्ल गुडधे पाटील आदी उपस्थित होते. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर बसलेल्या एकूण 60 झोपडपट्ट्यांबाबत चर्चा करण्यात आली. आमदार नागो गाणार यांनी यावेळी काही ठिकाणी शासन निर्णयानुसार पट्टे वाटप झाले नसल्याचे सांगितले. पालकमंत्री डॉ....

उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्र संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक

Image
उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्र संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; राज्यात पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता बाळगण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई, दि. २१ : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत अशी संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमा...

प्राथमिक शिक्षण पदविका : प्रथम वर्ष प्रवेश शासकीय कोटयातील जागा प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरी ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 22 ते 26 डिसेंबरची मुदत

  प्राथमिक शिक्षण पदविका : प्रथम वर्ष प्रवेश शासकीय कोटयातील जागा प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरी ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 22 ते 26 डिसेंबरची मुदत वाशिम ,   दि.  21  (जिमाका) :   प्राथमिक शिक्षण पदविका-प्रथम वर्ष सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय कोटयातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. अद्यापही शासकीय कोटयातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीतून ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीने प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या  www.maa.ac.in   या संकेतस्थळावरुन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सुचना, प्रवेश, नियमावली व अध्यापक विद्यालय निहाय रिक्त जागा याबाबतची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता ही इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावी. खुल्या संवर्गासाठी 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी 44.5 टक्के गुण असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भर...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २१ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील सिव्हील लाईन परिसरातील १, हिवरा पेन येथील २, मालेगाव तालुक्यातील चांडस येथील १, मंगरुळपीर शहरातील १, वाडा येथील १, लाठी येथील १, रामनगर येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील मारोती नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धनज येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला  कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६५३२ ऍक्टिव्ह – २३५ डिस्चार्ज – ६१४८ मृत्यू – १४८ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

नागपुरकरांनी अनुभवला दिव्यांगाचा सामाजिक सोहळा

Image
नागपुरकरांनी अनुभवला दिव्यांगाचा सामाजिक सोहळा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आशीर्वाद नागपूर,दि. 20 : ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु.वर्षा व मानस पुत्र चि. समीर यांचा शुभ विवाह आज सद्भावना हॉल, पोलीस लाईन्स टाकळी येथे संपन्न झाला. अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती आणि सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आशीर्वादात अतिशय थाटात हा विवाह सोहळा पार पडला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वधू पिता म्हणून कु. वर्षा हिचे कन्यादान केले. अनिल देशमुख व सौ.आरती देशमुख यांनी वधू पिता म्हणून वर पक्षाचे स्वागत केले तर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ.जोत्सना ठाकरे यांनी वर पिता म्हणून चि. समीरची जबाबदारी घेतली होती. विवाह सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊन यांनी आवर्जुन हजेरी लावली व वधुवरास आशीर्वाद दिला. यावेळी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास ठाकरे, मोहन मते, विकास कुंभारे, रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी मंत्री अनिस अहमद, रणजित देशमुख, रमेश बंग, सतिश चतुर्वेदी, माजी खासदार दत्ता मेघे, गि...