इयत्ता 1 ली आणि इयत्ता 2 री आदिम विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश 10 फेब्रुवारी 2021 पर्यत अर्ज मागविले
इयत्ता 1 ली आणि इयत्ता 2 री
आदिम विद्यार्थ्यांना मिळणार
इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश
10 फेब्रुवारी 2021 पर्यत अर्ज मागविले
वाशिम, दि. 22 : शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीत सन 2021-2022 या सत्रात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत मिळतील. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2021 ही आहे.
इयत्ता 1 ली आणि इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे असतील. या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थी हा दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा. पालकाच्या वार्षिक उत्पन्नाची अट कमाल मर्यादा 1 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. इयत्ता 1 लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेवू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे.
आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME