उचित सेवांकुरमधील अंध मुलामुलींना खाद्य पदार्थ व हिवाळी रगचे वाटप
उचित सेवांकुरमधील अंध मुलामुलींना
खाद्य पदार्थ व हिवाळी रगचे वाटप
वाशिम, दि. 22 : वाशिम येथून जवळच असलेल्या केकतउमरा येथील चेतन उचितकर यांच्या उचित सेवांकुर ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या सर्व अंध मुलामुलींना वाशिमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिलीप देशमुख यांचे पुत्र दुर्गेश देशमूख यांच्या हस्ते खाद्य पदार्थ आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळी रगचे वाटप 21 डिसेंबर रोजी केकतउमरा येथील अंध आश्रमात करण्यात आले.
दुर्गेश देशमुख यांनी आश्रमातील अंध मुला-मुलींशी संवाद साधून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात कुठलीही आवश्यकता पडल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अंध मुलांचे पालक श्री. पांडूरंग उचितकर यांनी अंध मुलाबद्दलची माहिती दिली. ही अंध मुले-मुली राज्यात विविध ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम तसेच शेतकंऱ्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम करून एक प्रकारे समाजकार्य करीत असल्याचे सांगितले.
केकतउमरा येथील सेवांकुर अंध आश्रमात अंध मुला-मुलींचा विवाह करुन ते व्यवस्थिपणे आपला संसार करीत आहे. अशा विवाहित अंध जोडप्यांकडून आपण बोध घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. पी. पी. देशपांडे यांनी केले. यावेळी उचितकर कुटूंबातील सर्व अंध मुले-मुली तसेच न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME