Posts

Showing posts from December, 2021

सतिश खरात यांना "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" जाहीर

Image
  सतिश खरात यांना "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" जाहीर मंठा प्रतिनिधी   युगनायक न्युज नेटवर्क        मंठा येथील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत सतिश खरात यांना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रॉडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने "राज्यस्तरीय कलावंत" हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून तो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , शाहीर अमर शेख, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथे देण्यात येणार असल्याचे कलावंत मंचचे अध्यक्ष सुनील मोंढे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.      मंठा तालुक्यातील लिंबेवडगावसारख्या एका छोट्याशा खेडेगावात राहून नाट्यकलावंत सतिश खरात यांनी पुणे, मुंबई, कोकण मधील दिग्गज कलाकारांसोबत नाट्यरंगभूमीवर ऐतिहासिक पात्राच्या भूमिका वठवल्या आहेत शिवाय नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयासोबतच अनेक लघुचित्रपटाची निर्मितीही केली आहे.        मध्यमहाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणभूमीत वाड्या-तांड्यावरील शाळेतून विद्यार्थ्या...

ताण-तणाव मुक्ती मार्गदर्शन शिबिर संपन्न

Image
  ताण-तणाव मुक्ती मार्गदर्शन शिबिर संपन्न वाशिम    युगनायक न्युज नेटवर्क              दि .२५ स्थानिक कामगार कल्याण केंद्र वाशिम व श्री सरस्वती समाजकार्य महा. विद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने एल. आय. सी कार्यालय वाशिम येथे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणाव मुक्ती  संदर्भात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयसिंग  ठाकुर शाखा प्रबंधक वाशिम तर प्रमुख पाहुणे प्रवीण टाक उपशाखाधिकारी वाशिम कार्यक्रचे मार्गदर्शक म्हणून डॉ रवि अवचार मानसिक रोग तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम,  सुनील सुर्वे, मनोवृत्ती सामाजीक कार्यकर्ते, राहुल कसादे मनोविकृती परिचारक आदी उपस्थित होते या मार्गदर्शन शिबिरात ताण-तणाव निर्माण होण्याची कारणे व त्यावरील उपाय यावर उद्बोधन करण्यात आले .तसेच कामगार कल्याण केंद्र वाशिम येथील केंद्रसंचालक देवानंद दाभाडे, ग्रंथपाल गजानन आरु कर्मचारी नवरे मॅडम व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल  हेकनुर यांनी केले तर आभार प्रदर्शन आश्विनी देवकर यांनी केले

राज्यातील तुरीचे उत्पादन घटणार शेतकऱ्या वर येणार उपासमारीची वेळ

Image
  राज्यातील तुरीचे उत्पादन घटणार शेतकऱ्या वर येणार उपासमारीची वेळ      रिसोड :-दि.१९ (भारत कांबळे प्रतीनिधी )      रिसोड तालुक्यातील बेलखेडा,आसेगावपेन ,कोयाळी बु, वरुड तोफा, येवती, रिठद , पारडीतिखे, हिवरापेन आदी गावातील शेतकऱ्याच्या शेतातील तुर पिकावर अचानक धुवा आल्याने सुकुन गेले आहे, तालुक्यातील बेलखेडा सह गावागावातील जास्तीत जास्त जमीन छेत्रात  शेतकऱ्यानी तुर पिकांची लागवड केली होती,सध्या परिस्थितीत तुरीला फुल व काही प्रमाणात शेगा फळधारना झालेली असुन ,मात्र अचानक पणे वातावरणातील बद्दलामुळे,धुके आल्याने तालुक्यातील गावागावांमधील तुर पिक हे सुकुन गेले असल्याचे शेतकरी सांगत आहेत, तोंडी आलेला घास हिरावल्याने अनेक शेतकरी कुंटुबियावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर गावच्या शेतकऱ्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे साधन नसल्याने  आम्ही जगाव की मराव असा प्रश्न शेतकऱ्याला पडला असुन आमच्याकडे आत्महत्या  केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्याकडुन सांगण्यात येत आहे, झालेल्या नुकसानीची पाहणी करून ,तालुका कृषि अधिकारी,संबधितानी सदर गावच्या नुकसान झाल...

स्व. नरसिंग राव बोडखे विद्यालय धोडप बु. चे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्तसामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन.

 स्व. नरसिंग राव बोडखे विद्यालय धोडप बु.  चे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्तसामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन. रिसोड   युगनायक न्युज नेटवर्क :- रिसोड तालुक्यातील धोडप बु येथे स्व. नरसिंगराव बोडखे या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान आचरण करण्यासाठी विद्यालय स्थापना करणारे स्व. भगवानराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप व रिसोड येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिवाजी विद्यालय मधील अकरावीमध्ये शिकणाऱ्या 101 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन परीक्षा दिली या परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद आरिफ सर विजयराव देशमुख सर अभिजीत देशमुख सर विजय ढेंगळे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे यावेळी स्व. नरसिंग रावजी बोडखे विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जन बाजड दिलीप भिसडे महेंद्रकुमार महाजन उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे आयोजन स्व. नरसिंग राव बोडखे  विद्यालयाचे सचिव संतोषराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तसेच स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालया ...

जउळका (रेल्वे ) येथिल दलित वस्तीतील रस्त्याची चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणांचा ईशारा

Image
  जउळका (रेल्वे ) येथिल दलित वस्तीतील रस्त्याची चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणांचा ईशारा जउळका (रेल्वे ) प्रतिनिधी  येथिल दलित वस्ती मध्ये सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणांचा ईशारा जऊळका येथील किशोर जनार्दन अवचार यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे       त्यांनी निवेदनात म्हटले आहे की जऊळका रेल्वे येथील वार्ड क्र 1 मध्ये दलित वस्ती मधिल सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे हे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे या कामाची चौकशी करावी त्याचे अंदाज पत्रक द्यावे चौकशी करून कार्यवाही न केल्यास वॉर्ड क्र 1 मधील नागरिका सह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे      निवेदनाच्या प्रतिलिपी जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हाधिकारी याना दिल्या आहेत

जउळका ग्राम सचिव पद केव्हा भरणार ...? सचिव विना गावाचा विकास झाला ठप्प...!

Image
  जउळका ग्राम सचिव पद केव्हा भरणार ...? सचिव विना गावाचा विकास झाला ठप्प...! ल्वे ( प्रतिनिधी सुरज अवचार ) तालुक्यातील जउळका ग्रामपंचायत सर्वात मोठी असून येथील ग्राम विकास अधिकारी  आर टी राऊत दिनांक ३०/ ११ रोजी सेवानिवृत्त झाले असून तेव्हापासून जउळका ग्रामपंचायतला अद्याप पर्यंत नवीन सचिवाचे नियुक्ती झाली नसल्यामुळे जनतेचे काम खोळंबले आहेत. त्यामुळे जउळका येथे त्वरित ग्रामपंचायत सचिव देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.           सविस्तर वृत्त असे की जऊळका रेल्वे येथील सेवानिवृत्त झालेल्या ग्राम विकास अधिकारी नंतर जउळका ग्रामपंचायतला ग्राम विकास अधिकारी त्वरित नियुक्ती व्हायला पाहिजे होती परंतु अद्याप पर्यंत नियुक्ती झाली नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत व पर्यायाने गावाचा विकास रखडला आहे.                तसेच ग्रामपंचायत जउळका येथे अद्याप पर्यंत एकही महिला सचिव मिळाली मिळाली नाही त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या ग्राम विकास अधिकारी पदी महिला की  पुरुष ग्रामविकास अधिकारी यांची या दोघांपैकी...

समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा अल्पसंख्याकदिनी लोकसेनेकडून जाहिर निषेध जिल्हाधिकारी यांच्या बैठकीवर बहिष्कार

Image
  समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा अल्पसंख्याकदिनी लोकसेनेकडून जाहिर निषेध जिल्हाधिकारी यांच्या बैठकीवर बहिष्कार  बीड युगनायक न्युज नेटवर्क  प्रतिनिधी अठरा डिसेम्बरला जागतिक अल्पसंख्याक हक़ दिवस साजरा केला जातो भारतात व महाराष्ट्रात ही दरवर्षी अल्पसंख्याक दिवस साजरा करण्याचे निर्देश सरकार प्रशासनाला देत असते परंतु हवालदील सरकार आणि उदासीन मानसिकतेचे प्रशासन जबाबदारीने अल्पसंख्याक दिवस साजरा करणार का? असा प्रश्न जनतेच्या वतीने लोकसेना प्रमुख प्रा.इलियास इनामदार यांनी केला आहे व लोकसेना संघटना जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त निवेदन देवून अल्पसंख्याक हक़ दिनी शासनाचा निषेध करुन जिल्हाधिकारी यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकून वाकआउट करण्यात आले आहे. निषेध करण्याचे कारण शासनाने मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण दिले नाही, अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवला नाही, उर्दू बालवाड़यांना अंगणवाडीत रूपांतर केले नाही,  राज्यात एमपीएससी/यूपीएससी अभ्यासकेंद्र स्थापन केले नाही,  मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाचे बजट वाढ करुन सर्वे व्यावसायिक कर्ज योजना सुरु केली नाही,  वक्फ जमीनीवरील बेकाय...

उद्या नाशिक येथे पंधरावे " विद्रोही मराठी साहित्य संमेलन" , ही बहुजन बांधवांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी

Image
  विद्रोही मराठी साहित्य संमेलन - एक समांतर चळवळ नाशिक - युगनायक न्युज नेटवर्क    नाशिकमध्ये ४ व ५ डिसेंबर रोजी   पंधरावे " विद्रोही मराठी साहित्य संमेलन" होत आहे, ही बहुजन बांधवांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी आहे.        बहुजन हा शब्द यासाठी वापरला आहे की, बहुजनांमध्ये अठरापगड जाती अर्थात वंचित आणि दुर्लक्षित समुह येतात...या बहुजनांचा विद्रोह इथल्या अभिजनवादी साहित्य संस्कृतीविरुद्ध आहे. हा केवळ विरोधासाठी विरोध नसून इथल्या परंपरावादी साहित्य चळवळीचा इतिहासच काल्पनिक कथांच्या भोवती घिरट्या घालत होता, अशा प्रकारचे साहित्य लेखन करणारा वर्ग इथल्या समाज वास्तवाकडे आजही कानाडोळा करत आहे.. म्हणून या काल्पनिक, मनोरंजनवादी,विचार सरणीच्या, पोट भरलेल्या परंपरावादी संस्कृतीचा.. इथल्या कष्टकरी बहुजन जनतेने का स्वीकार करावा.? हा प्रश्न अनेक बहुजन साहित्यिकांना सतावत  होता आणि तो आजही सतावतो आहे. गरीब, दलित, पीड़ित, दुर्बल, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार या 'नाही रे' वर्गाचे प्रश्न अखिल भारतीय साहित्य संमेलनात मांडले जात नव्हते, त्यात केवळ 'आहे रे' वर्ग...