स्व. नरसिंग राव बोडखे विद्यालय धोडप बु. चे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्तसामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन.
स्व. नरसिंग राव बोडखे विद्यालय धोडप बु. चे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्तसामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन.
रिसोड युगनायक न्युज नेटवर्क:- रिसोड तालुक्यातील धोडप बु येथे स्व. नरसिंगराव बोडखे या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान आचरण करण्यासाठी विद्यालय स्थापना करणारे स्व. भगवानराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप व रिसोड येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिवाजी विद्यालय मधील अकरावीमध्ये शिकणाऱ्या 101 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन परीक्षा दिली या परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद आरिफ सर विजयराव देशमुख सर अभिजीत देशमुख सर विजय ढेंगळे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे यावेळी स्व. नरसिंग रावजी बोडखे विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जन बाजड दिलीप भिसडे महेंद्रकुमार महाजन उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे आयोजन स्व. नरसिंग राव बोडखे विद्यालयाचे सचिव संतोषराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तसेच स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालया चे अध्यक्ष रविभाऊ गायकवाड यांच्या वतीने प्रथम /द्वितीय /तृतीय असे 3 क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थीला दि. 30 डिसेंबर रोजी मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME