ताण-तणाव मुक्ती मार्गदर्शन शिबिर संपन्न
ताण-तणाव मुक्ती मार्गदर्शन शिबिर संपन्न
वाशिम युगनायक न्युज नेटवर्क दि .२५ स्थानिक कामगार कल्याण केंद्र वाशिम व श्री सरस्वती समाजकार्य महा. विद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने एल. आय. सी कार्यालय वाशिम येथे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणाव मुक्ती संदर्भात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयसिंग ठाकुर शाखा प्रबंधक वाशिम तर प्रमुख पाहुणे प्रवीण टाक उपशाखाधिकारी वाशिम कार्यक्रचे मार्गदर्शक म्हणून डॉ रवि अवचार मानसिक रोग तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम, सुनील सुर्वे, मनोवृत्ती सामाजीक कार्यकर्ते, राहुल कसादे मनोविकृती परिचारक आदी उपस्थित होते या मार्गदर्शन शिबिरात ताण-तणाव निर्माण होण्याची कारणे व त्यावरील उपाय यावर उद्बोधन करण्यात आले .तसेच कामगार कल्याण केंद्र वाशिम येथील केंद्रसंचालक देवानंद दाभाडे, ग्रंथपाल गजानन आरु कर्मचारी नवरे मॅडम व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल हेकनुर यांनी केले तर आभार प्रदर्शन आश्विनी देवकर यांनी केले
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME