जउळका ग्राम सचिव पद केव्हा भरणार ...? सचिव विना गावाचा विकास झाला ठप्प...!
जउळका ग्राम सचिव पद केव्हा भरणार ...? सचिव विना गावाचा विकास झाला ठप्प...!
ल्वे ( प्रतिनिधी सुरज अवचार ) तालुक्यातील जउळका ग्रामपंचायत सर्वात मोठी असून येथील ग्राम विकास अधिकारी आर टी राऊत दिनांक ३०/ ११ रोजी सेवानिवृत्त झाले असून तेव्हापासून जउळका ग्रामपंचायतला अद्याप पर्यंत नवीन सचिवाचे नियुक्ती झाली नसल्यामुळे जनतेचे काम खोळंबले आहेत. त्यामुळे जउळका येथे त्वरित ग्रामपंचायत सचिव देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की जऊळका रेल्वे येथील सेवानिवृत्त झालेल्या ग्राम विकास अधिकारी नंतर जउळका ग्रामपंचायतला ग्राम विकास अधिकारी त्वरित नियुक्ती व्हायला पाहिजे होती परंतु अद्याप पर्यंत नियुक्ती झाली नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत व पर्यायाने गावाचा विकास रखडला आहे.
तसेच ग्रामपंचायत जउळका येथे अद्याप पर्यंत एकही महिला सचिव मिळाली मिळाली नाही त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या ग्राम विकास अधिकारी पदी महिला की पुरुष ग्रामविकास अधिकारी यांची या दोघांपैकी कोणाची नियुक्ती होणार अशी जोरदार चर्चा जनतेमध्ये होत आहे. तसेच पंधरा दिवसापासून ग्रामविकास अधिकाऱ्याचे रिक्त असलेले पद भरण्यात यावे अशी मागणी जनतेमधून होत आहे
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME