राज्यातील तुरीचे उत्पादन घटणार शेतकऱ्या वर येणार उपासमारीची वेळ
राज्यातील तुरीचे उत्पादन घटणार शेतकऱ्या वर येणार उपासमारीची वेळ
रिसोड :-दि.१९ (भारत कांबळे प्रतीनिधी ) रिसोड तालुक्यातील बेलखेडा,आसेगावपेन ,कोयाळी बु, वरुड तोफा, येवती, रिठद , पारडीतिखे, हिवरापेन आदी गावातील शेतकऱ्याच्या शेतातील तुर पिकावर अचानक धुवा आल्याने सुकुन गेले आहे, तालुक्यातील बेलखेडा सह गावागावातील जास्तीत जास्त जमीन छेत्रात शेतकऱ्यानी तुर पिकांची लागवड केली होती,सध्या परिस्थितीत तुरीला फुल व काही प्रमाणात शेगा फळधारना झालेली असुन ,मात्र अचानक पणे वातावरणातील बद्दलामुळे,धुके आल्याने तालुक्यातील गावागावांमधील तुर पिक हे सुकुन गेले असल्याचे शेतकरी सांगत आहेत, तोंडी आलेला घास हिरावल्याने अनेक शेतकरी कुंटुबियावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर गावच्या शेतकऱ्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे साधन नसल्याने आम्ही जगाव की मराव असा प्रश्न शेतकऱ्याला पडला असुन आमच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्याकडुन सांगण्यात येत आहे, झालेल्या नुकसानीची पाहणी करून ,तालुका कृषि अधिकारी,संबधितानी सदर गावच्या नुकसान झालेल्या तुर पिकांचा सर्वे करून आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी तालुका् भरातील शेतकरी राज्याकडुन होत आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME