Posts

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Image
  सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई दि. 29 : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने  मार्गदर्शक सूचना जारी  केल्या आहेत. ‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सा...

बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
  बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई , दि. २९ : - मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल. या ठिकाणच्या पोलिसांच्या निवासस्थानांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. पोलिसांच्या निवासस्थानांबाबत पुनर्विकास आणि पुनवर्सन यांच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या.   मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद ...

सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Image
  सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट मुंबई, दि. २८ : सरपंच परिषद मुंबईच्या एका १४ सदस्यीय शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सोमवारी (दि २८ जून) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या राज्यातील ३५ पेक्षा अधिक सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे - पालकमंत्री शंभूराज देसा ई वाशिम ,   दि. २८ :   जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोणीही बेसावध राहून चालणार नाही. कोरोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही, हे माहित नाही. परंतु, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज, २८ जून रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. ऑक्सिजन तुटवडा निर्माण होणा...

बृहन्मुंबई हद्दीत २४ जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

Image
बृहन्मुंबई हद्दीत २४ जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी मुंबई, दि. 28 :- बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (2), कलम 2 (6) आणि कलम 10 (2) नुसार बृहन्मुंबई हद्दीत 24 जुलै 2021 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, परवानेरहित बंदुका, सुऱ्या, काठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे, अग्नीशस्त्रे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, कोणतेही दाहक पदार्थ  किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नितीविरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी चित्रे - चिन्हे, फलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मनाई...

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा व्यक्ती, संस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन

Image
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा व्यक्ती, संस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन वाशिम ,   दि. २८  :   सन २०२० - २१ या वर्षापासून केंद्र सरकारने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली आहे. सन २०२१-२२ या वर्षात या योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया जसे आईसक्रीम ,  चीज निर्मिती ,  दूध पाश्चरायझेशन ,  दूध पावडर इत्यादी. ,  मांस निर्मिती व प्रक्रिया ,  पशुखाद्य ,  टीएमआर ब्लॉक्स ,  बायपास प्रोटिन ,  खनिज मिश्रण ,  मुरघास निर्मिती व प्रक्रिया ,  पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याजदरांमध्ये तीन टक्के सुट देण्यात येईल. पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना  http://dahd.nic.in/ahdf     या केंद्र सरकारच्या पशुपालन व डेअरी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या  http://ahd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ...

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा; १ जुलै पासून नवीन दर लागू होणार

Image
    गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा; १ जुलै पासून नवीन दर लागू होणार मुंबई , दि. 28 : गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार असल्याचे महसूल व वन विभागाने कळविले आहे. बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दर सुद्धा आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडाचा (लॅटराईट स्टोन) दर 150 रुपये प्रति ब्रास असेल. उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरुम, कंकर यांचा दर 600 रुपये प्रति ब्रास असेल. केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारे चॅल्सेडोनी खडे यांचा दर 3000 रुपये प्रति ब्रास असणार आहे. सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे तयार करण्याच्या प्रयोजनार्थ, धातूशास्त्रीय प्रयोजनार्थ, दृष्टिविषयक प्रयोजनार्थ, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या प्रयोजनार्थ, ...

शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Image
  शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम  - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर अमरावती , दि. २८ : दर्जेदार उत्पादन निर्मितीसह विपणन कौशल्य व तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे  प्रतिपादन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. कृषी विभाग, आत्मा व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली, त्याचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, वि. प. स. किरण सरनाईक, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, कृषी  सहसंचालक शंकर तोटेवार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), प्र...

आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना ‘मेळघाट हाट’चा प्लॅटफॉर्म – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Image
  आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना  ‘मेळघाट हाट’चा प्लॅटफॉर्म – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर अमरावती , दि. 28 : मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी ‘मेळघाट हाट’चा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येत आहे. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे. या उपक्रमातून मेळघाटातील भगिनींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा. त्यासाठी ‘मेळघाट हाट’ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करावी, असे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी ‘मेळघाट हाट’ प्रकल्प आकारास येत आहे. त्याअनुषंगाने नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण व चर्चेसाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी आदी उपस्थित होते. ‘माविम’चे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. पालकमंत...

महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर महिला व बालविकास भवनाचे भूमिपूजन अमरावती , दि. 28 : महिला व बालविकास योजना राबविणारी सगळी कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा निर्माण होणार असून, योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. येथील गर्ल्स हायस्कुल परिसरात महिला व बालविकास भवनाचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते. महिला व बालविकास उपायुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, राज्य महिला ...

‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम; पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम; पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ   निवडणूक यंत्रणेचा उपक्रम अमरावती , दि. 28 : निवडणुकीतील महत्वपूर्ण साधने असलेल्या ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट” यंत्रणा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाची उभारणी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख,  महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,  सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाकडून या कामासाठी 14 कोटी 99 लक्ष रुपये निधीच्या नियोजनाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे काम होत आहे. अशी असेल रचना गोदाम इमारतीची तळमजला व पहिला मजला अशी रचना असेल. एक ह...

‘सायंटिफिक पार्क’मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Image
  ‘सायंटिफिक पार्क’मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर                                          'सायन्सकोर'वर तारांगण' अमरावती , दि. 28  : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने शहरातील मध्यवर्ती भव्य सायन्सकोर मैदानाचे रूपांतर आता सायंटिफिक पार्कमध्ये होत आहे. हा उपक्रम महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या अमरावतीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केले. सायन्सकोर मैदानावर सायंटिफिक पार्कचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले. मैदानावर निर्माण करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक व इतर सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य...

बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Image
  बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर अमरावती , दि. 28 :  'उडान' उपक्रम बंदीजनांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळविणारा असून,  त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसनासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख,  महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,  सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते. कारागृहात बंदीजनांतील कारागीर, कलावंताच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यातून अनेकविध सुंदर वस्तू व...

मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवावी – पालकमंत्री सुभाष देसाई

Image
  मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवावी – पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद , दिनांक 28 - शहर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मनपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्यासह सर्व संबंधिंत अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. देसाई यांनी शासनाने मनपाच्या पदभरतीच्या आकृतीबंधास मान्यता दिलेली असून स्वायत्त संस्था असल्यामुळे मनपाला आपल्या स्तरावर पदभरती प्रक्रिया राबवण्याचे अधिकार  असल्याचे सांगून त्या माध्यमातून कंत्राटी पध्दती प्रतिनियुक्ती, सेवानिवृत्तधारकांना मुदत वाढ  या पध्दतीने तातडीने मनपाने पदभरती करण्याचे न...

वाहन उपलब्धतेमुळे पोलीस दलाचे कार्य अधिक गतिमान होईल – पालकमंत्री सुभाष देसाई

Image
  वाहन उपलब्धतेमुळे पोलीस दलाचे कार्य अधिक गतिमान होईल – पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद , दि.28,  :- पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. या पार्श्वभूमीवर डायल 112 या योजनेअंतर्गत पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक गतिमान होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शहर पोलिसांसाठी डायल-112 या योजनेअंतर्गत 74 दुचाकी वाहनांचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले, यावेळी श्री.देसाई बोलत होते. कार्यक्रमास सर्वश्री आमदार प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, अंबादास दानवे, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,  मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, संपूर्ण पोलीस दल हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्परतेने कार्य करुन अहोरात्र झटत असते. बदलत्या काळानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक क्रियाशी...

कोरोना_अलर्ट वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३८ जणांना डिस्चार्ज

Image
  कोरोना _ अलर्ट   वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३८ जणांना डिस्चार्ज ( दि. २८ जून २०२१)   वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; ३८ जणांना डिस्चार्ज   वाशिम :  दोडकी- १, काटा- १, किनखेडा- १, सुराळा- १.   रिसोड :  शहरातील- १.   मंगरूळपीर :  नवीन आठवडी बाजार- १.   कारंजा लाड :  नवजीवन कॉलनी- १.   जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जिल्ह्याबाहेर झालेल्या एका मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –   ४१३८८ ऍक्टिव्ह  –  २३७ डिस्चार्ज  –  ४०५३२ मृत्यू  –  ६१८ ( टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)