Posts

Showing posts from September, 2020

आजचा वाशिम जिल्ह्यातील कोरोना_अलर्ट

आजचा वाशिम जिल्ह्यातील कोरोना_अलर्ट (दि. ३० सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   * जिल्ह्यात आणखी ८५ कोरोना बाधित; ८८ जणांना डिस्चार्ज *   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील देवपेठ येथील ४, राजनी चौक येथील १, लाखाळा येथील १, पाटणी चौक येथील २, सिव्हील लाईन येथील २, योजना पार्क येथील १, गणेशपेठ येथील १, नालंदा नगर येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, वारा येथील १, पिंपळगाव येथील २, तोंडगाव येथील १, भटउमरा येथील १, अनसिंग येथील २, शिरसाळा येथील १, देपूळ येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, तामसी येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील २, अनंत कॉलनी परिसरातील १, गैबीपुरा येथील १, कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, हिवरा पेन येथील १, कोयाळी येथील १, गोवर्धन येथील १, सवड येथील १, पेनबोरी येथील १, भरजहांगीर येथील २, करडा येथील २, एकलासपूर येथील १, जवळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ४, वसंतवाडी येथील १, कार्ली येथील १, शेलूबाजार येथील १, वनोजा येथील १, मोहरी येथील १, पेडगाव येथील १, मालेगाव शहरातील ७, वारंगी येथील १, कोठा येथील १, अमानी येथील १, मु...

जिल्हास्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्यासंदर्भात समितीने प्रारुप तयार करण्याचे विधानसभा अध्यक्ष पटोले यांचे निर्देश

Image
  जिल्हास्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्यासंदर्भात समितीने प्रारुप तयार करण्याचे विधानसभा अध्यक्ष पटोले यांचे निर्देश मुंबई, दि. 29 : सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते.  यासाठी भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे न्यायाधिकरण तसेच जिल्हास्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष, नाना पटोले आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरावर असे न्यायाधिकरण, कृषी न्यायालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण प्राधान्याने करता येईल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार  वीरेंद्र जगताप, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त श्री. धीरजकुमार, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, विधी व न्याय विभागाचे भूपेंद्र गुरव, किसान ...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

  वाशिम  जिल्ह्यातील  आजचा  कोरोना  अलर्ट  (दि. २९ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी ११९ कोरोना बाधित; ७२ जणांना डिस्चार्ज   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील २, नारायण बाबा चौक येथील १, योजना पार्क येथील १, पाटणी चौक येथील १, सिव्हील लाईन येथील २, पोलीस वसाहत परिसरातील २, सुंदरवाटिका येथील १, समर्थ नगर येथील १, लाखाळा येथील १, सुदर्शन नगर येथील १, गणेश नगर येथील १, कोल्हटकरवाडी परिसरातील १, पोलीस स्टेशन मागील परिसरातील १, काळे फाईल येथील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरातील १, सीताराम नगर येथील १, संतोषी माता नगर येथील १, जुनी आययुडीपी परिसरातील १, मोठा उमरा येथील १, तामसी येथील ८, अडोळी येथील २, काटा येथील २, कार्ली येथील २, ब्रह्मा येथील १, शेलगाव येथील १, देपूळ येथील १, भटउमरा येथील १, केकतउमरा येथील १, अनसिंग येथील १, गणेशपूर येथील १ ,  रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, गजानन नगर येथील १, आसनगल्ली येथील १, एकता नगर येथील १, शहरातील इतर ...

सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून होणार

Image
  सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून होणार मुंबई, दि. २९ : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी दि. १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. खरेदीला सुरुवात दि.१५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीनसाठी हमी भाव ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी दि.१ ऑक्टोबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेद...

महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांची अफगाणिस्तानच्या महावाणिज्य दूतांनी घेतली भेट

Image
  महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांची अफगाणिस्तानच्या महावाणिज्य दूतांनी घेतली भेट मुंबई, दि. 29 : भारत तसेच महाराष्ट्राशी अफगाणिस्तानचे ऐतिहासिक संबंध असून महिला व बालविकासाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या चांगल्या कामगिरीच्या संकल्पना, कौशल्य अफगाणिस्तानला पुरविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. परस्पर सहकार्याच्या अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर यांची आज अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत श्रीमती झकिया वार्दक यांनी भेट घेतली. महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाची अफगाणिस्तानमधील महिला मंत्रालयासोबत ऑनलाईन बैठक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन श्रीमती वार्दक म्हणाल्या, त्यामुळे राज्यामध्ये महिला व बाल सक्षमीकरणाचे कार्यक्रम कशा पद्धतीने राबविले जात आहेत याची माहिती अफगाणिस्तानच्या मंत्रालयाला मिळू शकेल. ॲड. ठाकूर म्हणाल्या, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील महिला व बाल सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांची माहिती अफगाणिस्तानला या क्षेत्रातील धोरणे बनवितान...

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम ,  दि. २९ :  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरीता वाशिम जिल्ह्याकरीता लक्षांक प्राप्त झाला आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा ९० टक्के तर लाभार्थ्यांचा १० टक्के सहभाग राहणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ ,  उद्योग भवन दारव्हा रोड ,  यवतमाळ येथील शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत अर्ज वितरीत केले जातील, तसेच विहित अर्ज व संपूर्ण कागदपत्रांची फाईल १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वीकारली जाईल. संपूर्ण कागदपत्रे असल्याशिवाय फाईल स्वीकारली जाणार नाही, असे यवतमाळ येथील शाखा व्यवस्थापक यांनी कळविले आहे. या कर्ज योजनेतून महिला सशक्तीकरण २८ ,  लहान उद्योग धंदे ०६ ,  होटल ढाबा ०२ ,  स्पेअर पार्ट ,  गॅरेज ,  ऑटो वर्कशॉप ०२ ,  स्वयंमसहाय्यता बचत गट ०४ असे लक्षांक प्राप्त झाले आहेत. उद्दीष्टाच्या १ : १.०५ या प्रमाणात अंतिम मंज...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम ,  दि. २९ :  राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडमुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रयाक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी २ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत. लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने तालुकास्तरावर २७ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने कृषि पदवी किंवा पदविकाधारक, महिला बचत गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा कालावधी २ वर्षाचा आहे. योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लक्ष ३० रुपये या प्रमाणात अनुदान देय राहील. पहिल्या टप्प...

वेळेत निदान, उपचारामुळे अत्यावस्थ महिला झाली कोरोनामुक्त • वाशिम कोविड रुग्णालयात यशस्वी उपचार

Image
  वेळेत निदान, उपचारामुळे अत्यावस्थ महिला झाली कोरोनामुक्त •    वाशिम कोविड रुग्णालयात यशस्वी उपचार वाशिम ,   दि. २८ (जिमाका) :  येथील जिल्हा कोविड रुग्णालयात एक महिन्यापूर्वी अत्यावस्थ स्थितीत दाखल झालेली रिसोड शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. वेळीच निदान होवून तातडीने उपचार मिळाल्यास कोरोना संसार्गावर मात करता येते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी कोणतीही भीती न बाळगता, दुखणे अंगावर न काढता त्वरित आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये कोरोना बाधित आढळलेल्या रिसोड शहरातील ६५ वर्षीय महिलेला २५ ऑगस्ट रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर महिलेची तब्येत खालावली असल्याने तसेच तिला स्वतः श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येत असल्याने व्हेंटिलेटरच्या सहाय्याने कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देवून तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले, मात्र रुग्णाचे शरीर उपचारासाठी अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते. तरीही कोविड रुग्णालयातील वैद्यकीय चमूने आपले प...

१ ऑक्टोबर पासून ‘रेनॉल्ड हॉस्पिटल’ येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर • ३४ बेडची सशुल्क सुविधा; ८ ऑक्सिजन बेड

Image
१ ऑक्टोबर पासून ‘रेनॉल्ड हॉस्पिटल’ येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर •३४ बेडची सशुल्क सुविधा; ८ ऑक्सिजन बेड वाशिम, दि. २८ : कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून वाशिम शहरातील रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, २८ सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. १ ऑक्टोबर पासून सदर कोविड हेल्थ सेंटर सुरु होईल. त्यामुळे कोरोना विषयक चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी ३४ बेडची सशुल्क सुविधा उपलब्ध होईल, त्यापैकी ८ ऑक्सिजन बेड असतील. ‘आयसीएमआर’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे, तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्ग चोवीस तास नियमितपणे उपस्थित ठेवणे, निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवणे, तसेच हेल्थ सेंटरमध्ये पुरेशा प्रमाणात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), रुग्णवाहिका असणे बंधनकारक राहणार आहे. ज्या व्य...

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कोविडसाठी काम करावे – पालकमंत्री उदय सामंत

Image
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कोविडसाठी काम करावे – पालकमंत्री उदय सामंत   सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 26 :  सध्या जिल्ह्यात कोविडचे प्रमाण वाढत आहे. आशावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रशासनासोबत काम करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ॲपच्या माध्यमातून आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, लोकांना सध्या मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. राजकीय भूमिका बाजूला ठेऊन एकत्र यावे. कोरोना पासून सर्व जिल्हावासियांचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी प्रशासनासोबत सहकार्याने काम करणे ही आजची गरज आहे. आरोप – प्रत्यारोप होतच राहतील पण त्याच वेळी जिल्ह्यावासियांच्या आरोग्याची काळजीही आपणा सर्वांना घ्यावयाची आहे असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले. कोविडच्या वॉर...

खावटी योजनेसाठी पात्र आदिवासी बांधवांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन ·

  खावटी योजनेसाठी पात्र आदिवासी बांधवांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन ·          अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटूंबाला ४ हजार रुपये अनुदान वाशिम ,   दि. २५ (जिमाका) :  आर्थिक विवंचनेतील आदिवासी बांधवांना आधार देणारी खावटी अनुदान योजना एक वर्षासाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले आहे.   कोरोना साथीचा प्रादुर्भाव व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरूवातीला लागू करण्यात आलेले लॉकडाऊन, नंतर संचारबंदी आदींमुळे आदिवासी बांधवांपुढेही रोजगाराची अडचण उभी राहीली. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगातंर्गत विकास कामे गतीने राबविण्यात येवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. आता खावटी योजनाही लागू करण्यात आली आहे. सन २०१३-१४ पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. योजनेनुसार अनुसूचित जमाती कुटूंबांना एकूण ४ हजार रुपये अनुदान देण्यात येई...

नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

Image
  नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करताना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल. यासाठी शासन पातळीवरुन जिल्हा प्रशासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम कल्पक व प्रभावीपणे राबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेंतर्गत लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. एखाद्या कुटुंबात कुणाला आरोग्य विभागाने गृहविलगीकरणाचा सल्ला दिला तर त्याला ही प्रक्रिया सहज आणि सुलभ लक्षात यावी व याचबरोबर अत्यावश्यक असलेली औषधोपचार देता यावीत यासाठी एक कल्पक किट तयार करण्यात आले. या किटचेही त्यांनी कौतुक करुन इतर उपक्रमास शुभेच्छा दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पा...

मुख्यमंत्र्यांकडूनअमरावती विभागाचा आढावा

Image
  मुख्यमंत्र्यांकडूनअम रावती विभागाचा आढावा ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ’  मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ·           मुख्यमंत्र्यांकडून अमरावती विभागाचा आढावा वाशिम ,   दि. २६ (जिमाका) :  कोरोनाविरुद्ध लढा देताना आरोग्य सुविधेवर ताण येवू नये, यासाठी कोरोना संसर्गाच्या वेगावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभागाची गरज असून, या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून जनजागृती करण्यासाठी  ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ’  मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल ,  असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने  ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम ’,  घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांमध्ये करावयाच्या जनजागृती आदीबाबत त्यांनी माहिती घेतली. या बैठकीला अमरावती जिल्ह्या...

कोरोना_अलर्ट (दि. २६ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

    कोरोना_अलर्ट (दि. २६ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी ८२ कोरोना बाधित; १३३ जणांना डिस्चार्ज   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १०, शिक्षक कॉलनी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, गणेशपेठ येथील २, सिंधी कॅम्प येथील १, लाखाळा परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, जुनी नगरपरिषद परिसरातील २, करुणेश्वर मंदिर परिसरातील १, देवपेठ येथील २, विनायक नगर येथील १, माधवनगर येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, मोहजा रोड येथील १, तामसी येथील १, काजळंबा येथील १, मालेगाव शहरातील नागरतास रोड परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कवरदरी येथील १, शिरपूर जैन येथील २, घाटा येथील १, जामखेड येथील १, वाघळूद येथील १, बोरगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील १०, पिंप्री अवगण येथील ४, भडकुंभा येथील १, मोहरी येथील १, रिसोड शहरातील प्रोफेसर कॉलनी येथील १, लोणी फाटा येथील १, गणेशपूर येथील २, पिंप्री सरहद येथील १, गोवर्धन येथील ३, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील बालाजी नगरी येथील १,...

रिसोड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन

Image
रिसोड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन रिसोड प्रतिनिधी......  कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले असतांना या महामारीत शेतकरी संपूर्ण भरडला गेला आहे.त्यांच्या मालाला उत्पादन खर्च प्रचंड तर उत्पादन शून्य झाले आहे.खते,बियाणे,रासायनिक औषधे यांच्या किमती गगनाला भिडल्या असतांना उत्पादन काढून घरखर्च कसा भागवावा या प्रचंड विवंचनेत शेतकरी असताना रिसोड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.उडीद व मुंग पिकाला झाडावरच कोंब आल्यामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला असतांना शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा सोयाबीन पिकावर असतांना उभ्या सोयाबीन च्या झाडाला कोंब आले आहेत त्यामुळेच प्रशासनाने त्वरित तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार रिसोड यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार डॉ. रवींद्र मोरे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.रंगनाथ धांडे,कायदेविषयक सल्लागार ऍड.डी. टी.मोरे,जिल्हा परिषद सदस...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Image
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकांचे लोकार्पण पुणे, दि. २५ :  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या रुगणवाहिका सेवेत दाखल होत आहेत. विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आ. चेतन तुपे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, यांच्यासह तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेने संकटाच्या काळात कायम मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटातही रुग्णवाहिका देवून ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिली आह...