रिसोड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन
रिसोड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन
रिसोड प्रतिनिधी......
कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले असतांना या महामारीत शेतकरी संपूर्ण भरडला गेला आहे.त्यांच्या मालाला उत्पादन खर्च प्रचंड तर उत्पादन शून्य झाले आहे.खते,बियाणे,रासायनिक औषधे यांच्या किमती गगनाला भिडल्या असतांना उत्पादन काढून घरखर्च कसा भागवावा या प्रचंड विवंचनेत शेतकरी असताना रिसोड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.उडीद व मुंग पिकाला झाडावरच कोंब आल्यामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला असतांना शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा सोयाबीन पिकावर असतांना उभ्या सोयाबीन च्या झाडाला कोंब आले आहेत त्यामुळेच प्रशासनाने त्वरित तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार रिसोड यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार डॉ. रवींद्र मोरे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.रंगनाथ धांडे,कायदेविषयक सल्लागार ऍड.डी. टी.मोरे,जिल्हा परिषद सदस्य अनिल गरकळ,पं.स सदस्य अश्रूबा नवले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रल्हाद कोकाटे,शहराध्यक्ष प्रदिप खंडारे,शहर महासचिव जहुर खान,मंगेश राजूरकर, विशाल इंगळे, सुखदेव शिरसाट,लक्ष्मण तुरेराव,शेषराव तुरेराव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME