शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या
कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. २९ : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरीता वाशिम जिल्ह्याकरीता लक्षांक प्राप्त झाला आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा ९० टक्के तर लाभार्थ्यांचा १० टक्के सहभाग राहणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, उद्योग भवन दारव्हा रोड, यवतमाळ येथील शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत अर्ज वितरीत केले जातील, तसेच विहित अर्ज व संपूर्ण कागदपत्रांची फाईल १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वीकारली जाईल. संपूर्ण कागदपत्रे असल्याशिवाय फाईल स्वीकारली जाणार नाही, असे यवतमाळ येथील शाखा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
या कर्ज योजनेतून महिला सशक्तीकरण २८, लहान उद्योग धंदे ०६, होटल ढाबा ०२, स्पेअर पार्ट, गॅरेज, ऑटो वर्कशॉप ०२, स्वयंमसहाय्यता बचत गट ०४ असे लक्षांक प्राप्त झाले आहेत. उद्दीष्टाच्या १ : १.०५ या प्रमाणात अंतिम मंजूरीसाठी अर्ज सादर करावयाचे आहे. सदर कर्ज योजनेसाठी व्यवसायाचे अर्ज सादर करतांना जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शैक्षिणिक पात्रतेचे कागदपत्र, आदिवासी विभागाचे नाव नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, रेशन कार्ड, व्यवसायाचे कोटेशन, लाभार्थी व दोन जमानतदाराचा सातबारा किंवा घराचा ८-अ नमुना, दोन फोटो, बँकेचे निलचे दाखले व ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेचे ना-हरकत प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जाची किंमत १० रुपये आहे. शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, उद्योग भवन दारव्हा रोड, यवतमाळ, येथे लाभार्थ्यांनी स्व:ताचे ओळखपत्र, आधारकार्ड दाखवून व्यवसायाचे अर्ज प्राप्त करून घ्यावा. कार्यालयाचे संपर्क क्रमांक ०७२३२-२५३१६९ असून सविस्तर अटी, शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावलेले आहेत. कार्यालयाचा कोणताही दलाल, अभिकर्ता नाही. जर असे व्यक्ती, समुह आढळल्यास अर्जदारांनी लेखी स्वरूपात तक्रार करावी. जेणेकरून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करता येईल. तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये. जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महामंडळाचे शाखा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME