जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वितरण
जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वितरण • १ ते १९ वर्षे वयोगटातील ३ लाख ३९ हजार मुलांना लाभ • आशा , अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जावून वितरण वाशिम , दि.२० (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २१ सप्टेंबर २०२१ रोजी जंतनाशक गोळ्यांचे सर्व शाळांमध्ये, तसेच घरोघरी जावून वितरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज , २० सप्टेंबर रोजी झाली. सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमी...