सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० प्रारुपाबाबत ४५ दिवसांत सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन
सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० प्रारुपाबाबत ४५ दिवसांत सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन
मुंबई, दि.17: सामाजिक सुरक्षा संहिता, 2020(2020 चा 36) याच्या कलम 154 व कलम 156 तसेच सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, 1897 (1897 चा 10)याच्या कलम 24 याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि प्रसुती लाभ अधिनियम, 1961 (1961 चा 53) अन्वये केलेले महाराष्ट्र प्रसुती लाभ नियम, 1965, उपदान प्रदान अधिनियम, 1975 (1972 चा 39) अन्वये केलेले उपदान प्रदान (महाराष्ट्र) नियम, 1972 व असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 (2008 चा 33) अन्वये केलेले महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम, 2013 यांचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुप, त्याद्वारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी,कलम 154 च्या पोट कलम (1) व कलम 156 च्या पोट- कलम(1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून 45 दिवस समाप्त झाल्यानंतर हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 अधिसूचना 27.8.2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400059 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर प्राप्त होतील असे कोणतेही आक्षेप/सूचना शासकनाकडून विचारात घेण्यात येतील.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME