वाकद येथील लाईन गाव फिडरवरून जोडण्याची मागणी.
वाकद येथील लाईन गाव फिडरवरून जोडण्याची मागणी.
रिसोड/तालुका प्रतिनिधी:- तालुक्यातील ग्राम वाकद येथील पाण्यासाठी केलेली नळयोजना ही गावापासून काही मीटर अंतरावरील नदीकाठी असलेल्या विहिरी वरून करण्यात आलेली आहे या पाणीपुरवठा करिता विद्युत पुरवठा हा विहिरी शेजारी खांबावरून केला आहे परंतु तो विद्युत फिडर शेतीसाठी वापरात येत असल्यामुळे सध्या त्यावरील विद्युत पुरवठा सतत खंडित असतो त्यामुळे आवश्यक वेळी वाकद वासियांना पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही तरी त्या पाईपलाईन साठी गाव फिडर वरील विद्युत पुरवठा जोडण्यात यावा जेणेकरून नेहमीसाठी पाणीपुरवठा करता येईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष सय्यद अकील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे ही बाब यापूर्वी वाकद ग्रामपंचायतचे सरपंच अमोल देशमुख, उपसरपंच प्रयागबाई शिवाजी थोरात व इतर सर्व सदस्यांनी एकमताने ठराव घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिलेली आहे परंतु विद्युत मंडळ या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने वाकद येथील ग्रामस्थांच्या भावना व गैरसोय लक्षात घेता ताबडतोब गावातील फीडवरून विद्युत पुरवठा जोडावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सय्यद अकिल यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME