Posts

जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वितरण

Image
  जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वितरण •  १ ते १९ वर्षे वयोगटातील ३ लाख ३९ हजार मुलांना लाभ •  आशा ,  अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जावून वितरण वाशिम , दि.२० (युगनायक न्युज नेटवर्क) :  जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २१ सप्टेंबर २०२१ रोजी जंतनाशक गोळ्यांचे सर्व शाळांमध्ये, तसेच घरोघरी जावून वितरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज ,  २० सप्टेंबर रोजी झाली. सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड ,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमी...

वाकद येथील लाईन गाव फिडरवरून जोडण्याची मागणी.

Image
  वाकद येथील लाईन गाव फिडरवरून जोडण्याची मागणी. रिसोड / तालुका प्रतिनिधी :- तालुक्यातील ग्राम वाकद येथील पाण्यासाठी केलेली नळयोजना ही गावापासून काही मीटर अंतरावरील नदीकाठी असलेल्या विहिरी वरून करण्यात आलेली आहे या पाणीपुरवठा करिता विद्युत पुरवठा हा विहिरी शेजारी खांबावरून केला आहे परंतु तो विद्युत फिडर शेतीसाठी वापरात येत असल्यामुळे सध्या त्यावरील विद्युत पुरवठा सतत खंडित असतो त्यामुळे आवश्यक वेळी वाकद वासियांना पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही तरी त्या पाईपलाईन साठी गाव फिडर वरील विद्युत पुरवठा जोडण्यात यावा जेणेकरून नेहमीसाठी पाणीपुरवठा करता येईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष सय्यद अकील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे ही बाब यापूर्वी वाकद ग्रामपंचायतचे सरपंच अमोल देशमुख, उपसरपंच प्रयागबाई शिवाजी थोरात व इतर सर्व सदस्यांनी एकमताने ठराव घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिलेली आहे परंतु विद्युत मंडळ या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने वाकद येथील ग्रामस्थांच्या भावना व गैरसोय लक्षात घेता ...

भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा आदर्श ठेवून अभियंत्यांनी कामे करावीत – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Image
भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा आदर्श ठेवून अभियंत्यांनी  कामे करावीत – पालकमंत्री  बाळासाहेब पाटील सातारा दि. 18 : देशाच्या तसेच राज्याच्या जडणघडणीत अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श समोर ठेवून अभियंत्यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून‍ जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अभियंत्यांना आदर्श अभियंता पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल विकास समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अध...

सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

Image
सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन   मुंबई दि १९ - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनाली नवांगुळ व मंजूषा कुलकर्णी यांचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोनाली नवांगुळ यांना ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीसाठी तर डॉ. मंजूषा कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून आनंद वाटला. सोनाली नवांगुळ व डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात करीत पुरस्कार प्राप्त केल्याचे समजून विशेष अभिमान वाटला. उभय लेखिकांचे हार्दिक अभिनंदन करतो व भविष्यातही त्यांचेकडून साहित्यसेवा घडो या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर पत्रात म्हटले आहे.

अतिवृष्टी आणि कोरोना आपत्तीतील संकट काळात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमधून जिल्ह्यात सकारात्मक काम – पालकमंत्री धनंजय मुंडे

Image
अतिवृष्टी आणि कोरोना आपत्तीतील संकट काळात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमधून जिल्ह्यात सकारात्मक काम – पालकमंत्री धनंजय मुंडे बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात संपन्न; स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना श्रद्धांजली   बीड ,  दि.17:--  अतिवृष्टी आणि कोरोना आपत्तीतील संकट काळात योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमधून जिल्ह्यात सकारात्मक काम होत आहे. ग्रामीण भागाची देखील विकासाकडे वाटचाल होत असून आपल्या सगळयांसह पुढील काळात देखील येणाऱ्या आपत्तींवर मात करुन विकासाची  वाटचाल करु असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ पोलीस मुख्यालय मैदान बीड येथे संपन्न झाला.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक आर राजा,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या सह प्रमु...

‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

Image
‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची केली स्थापना मुंबई, दि. 19 : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता राज्यमंत्री सत्तार आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यास करणार आहेत. त्यामुळे श्री. सत्तार यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, असाही राज्यमंत्री सत्तार यांचा मानस आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञाना...

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

Image
साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा   नवी दिल्ली ,   19    :   ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च  मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तसेच, सोनाली नवांगुळ यांना मराठीतील अनुवादासाठी आणि डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत व देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने शनिवारी मानाच्या फेलोशिपची व वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फेलोशिप पुरस्कारांसाठी 7 साहित्यिकांची तर 24 भाषांतील अनुवाद  पुरस्कारांची  निवड करण्यात आली. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची मानाची फेलोशिप ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषेतील साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची फेलो‍शिप जाहीर...

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

Image
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन   मुंबई, दि. 17 : देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्थेने नामांकने पाठविण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.भि.मोरये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केले आहे. राष्ट्रीय एकात्मता दिन 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. व्यक्ती अथवा संस्था यांनी आपल्या कार्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग 31 ब यांच्याकडे पाठवावयाची आहे. या पुरस्कारासाठी कोणतीही भारतीय नागरिक वा भारतातील संस्था किंवा संघटना व्यक्ती अथवा संस्थेचे नामांकन करू शकतात. या पुरस्कारासाठी नागरिकांनी नामांकने पाठवावीत असे आवाहनही श्री. मोरये यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

तीन राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

Image
तीन राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती मुंबई दि 17 : माहिती आयोगात  राज्य माहिती आयुक्त म्हणून  सुरेशचंद्र गैरोला, समीर  सहाय, आणि राहुल भालचंद्र पांडे या तिघांची नेमणूक करण्याची अधिसूचना  काढण्यात आली. या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मान्यता दिली असून राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना काल १६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली.  

सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० प्रारुपाबाबत ४५ दिवसांत सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

Image
सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० प्रारुपाबाबत ४५ दिवसांत सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन   मुंबई, दि.17:  सामाजिक सुरक्षा संहिता, 2020(2020 चा 36) याच्या कलम 154 व कलम 156 तसेच सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, 1897 (1897 चा 10)याच्या कलम 24 याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि प्रसुती लाभ अधिनियम, 1961 (1961 चा 53) अन्वये केलेले महाराष्ट्र प्रसुती लाभ नियम, 1965, उपदान प्रदान अधिनियम, 1975 (1972 चा 39) अन्वये केलेले उपदान प्रदान (महाराष्ट्र) नियम, 1972 व असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 (2008 चा 33) अन्वये केलेले महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम, 2013 यांचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुप, त्याद्वारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी,कलम 154 च्या पोट कलम (1) व कलम 156 च्या पोट- कलम(1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या...

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/ पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन

Image
 विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/ पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन   मुंबई, दि. 17 : इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी. आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणिय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य, यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुं...

गरीबांना न्याय देण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची : कृषीमंत्री दादाजी भुसे

Image
गरीबांना न्याय देण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची : कृषीमंत्री दादाजी भुसे शक्ती प्रदत्त समितीच्‍या बैठकीत कृषीमंत्र्यांचे आवाहन मालेगाव , दि. 17  :  शक्ती प्रदत्त समितीच्या अहवालानंतर जिल्हाभरातील गावठाण, गायरानसह शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे सर्व प्रलंबीत प्रस्ताव पुढील 15 दिवसात मार्गी लावण्याच्या सूचना देतांनाच गरिबांना न्याय देण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. सर्वांसाठी घरे 2022 या योजनेतंर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत जिल्हास्तरीय बैठक शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे आयोजित बैठकीत कृषी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी  उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ.बी.जी.बिडकर, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे आदि उपस्थित होते. शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे हा जुना विषय असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयानुसार नियमानु...

विस्तीर्ण मराठवाड्यातील विकास कामांच्या गतीसाठी विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्यक – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

Image
विस्तीर्ण मराठवाड्यातील विकास कामांच्या गतीसाठी विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्यक – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण   नांदेड   दि. 18 : मराठवाड्याचे विस्तीर्ण क्षेत्र, आठ जिल्ह्यातील विकास कामांचा असलेला अनुशेष आणि नागरिकांच्या गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन शासनाने हाती घेतलेल्या विविध लोकाभिमुख योजनांच्या कामांना गती देण्यासाठी प्रमुख कार्यालयांचा विस्तार व अतिरिक्त सुविधा निर्माण करुन देणे अत्यावश्यक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, इमारती यांचे संकल्पचित्र, गुणवत्ता नियंत्रण व दक्षता या संदर्भातील प्राथमिक कामे वेळीच पूर्ण होण्याच्या दृष्टीने नांदेड येथे ही दोन स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता ही दोन्ही कार्यालये नांदेड येथे सुरू झाल्याने 4 जिल्हे औरंगाबाद विभागात तर इतर 4 जिल्हे नांदेड विभागात सुरू झाल्याने संकल्पचित्र व गुणवत्ता नियंत्रण कामांना गती मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. नांदेड येथे स्नेहनगर भागातील सार्वज...

जल व मृद संधारणाच्या माध्यमातून कृषि विकासास चालना द्यावी – अपर मुख्य सचिव नंद कुमार

Image
जल व मृद संधारणाच्या माध्यमातून कृषि विकासास चालना द्यावी – अपर मुख्य सचिव नंद कुमार रोहयो, मृद व जलसंधारणाची कार्यशाळा संपन्न   नंदुरबार   दि. 18 : जल व मृदसंधारणाच्या कामांतून कृषी क्षेत्राचा विकास करता येणे शक्य आहे. त्याकरिता शेतकऱ्‍यांशी संवाद साधून कामकाजाची रूपरेषा ठरवावी व या कामांना चालना द्यावी, अशा सूचना रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या. रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंद कुमार यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रत्येक शेताला पाणी’ आणि  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाबाबत कार्यशाळा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, प्रादेशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. श्री. नंदकुमार म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध प्रकारची कामे घेता येतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोहयोतून जलसं...

खेळाडूंना सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Image
खेळाडूंना सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री बाळासाहेब पाटील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन   सातारा दि. 18 : राज्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा संकुलांच्या माध्यमातून खेळाडुंना पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी  उपस्थित होते. साताऱ्यात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट व्हावे अशी खेळाडूंची असलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे.  चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा संकुलातील खेळाडूंच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी  सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट तयार...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील विविध उपक्रमांचे उद्घाटन संपन्न

Image
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील विविध उपक्रमांचे उद्घाटन संपन्न   बारामती , दि.18 : बारामती तालुका दूध उत्पादक संघाच्यावतीने खंडोबानगर येथील पेट्रोल पंप, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम, नंदन मिल्क पार्लर व टोरेंट गॅसच्या नंदन पेट्रोलियम सीएनजी स्टेशनचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, बारामती पंचायत समिती सभापती नीती फरांदे, एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप,  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात, टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालक श्रीधर तांब्रपाणी, बारामती दूध संघाचे उपध्यक्ष राजेंद्र रायकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव,  दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन ढोपे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री.पवार म्हणाले, बारामती दूध संघाने सुरू केलेले पेट्रोल पंप, टोरेंट गॅसचा सीएनजी प्रकल्प, नंदन डेअरी मिल्क पार्लर हे चांगले उपक्रम असून याच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. याठिकाणी...

कुरेशी समाजाने शिक्षणाची कास धरावी शिक्षण असेल तरच टिकेल. प्रा लुकमान कुरेशीन

Image
  कुरेशी समाजाने शिक्षणाची कास धरावी शिक्षण असेल तरच टिकेल. प्रा लुकमान कुरेशीन महेकर .(युगनायक न्युज नेटवर्क)  तालुका प्रतिनिधी   दि. १७ शुक्रवार रोजी ५ वाजता कुरेशी समाजाचा पद वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी महेकर शहराचे कुरेशी समाजाचे नेतृत्व करणारे प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणारे वेळोवेळी समाजाचे मार्गदर्शन करणारे असे आदर्श व्यक्ती महत्त्व असणारे महेकर नगर परिषद चे मा न प सदस्य मुजीब हसन शेख हबीब कुरेशी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र देण्यात आले हा कार्यक्रम हबीब कुरेशी फंक्शन हाॅल येथे. आॅल इंडिया जमीयतुल कुरैश सामाजिक संघटनेच्या वतीने कुरेशी समाजाचा पद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा लुकमान कुरेशी आॅल इंडिया जमीयतुल कुरैश बुलढाणा जिल्हाध्यक्ष होते. या वेळी आॅल इंडिया जमीयतुल कुरैश चे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पद वाटप करण्यात आले अ. अजीज शेख चांद कुरेशी यांना महेकर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मुजाहीद हसन मुजीब हसन कुरेशी यांना शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. शेख ...

वाशिम जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

Image
  वाशिम जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन ·           सर्व तालुका न्यायालयांमध्ये होणार सुनावणी ·           दाखलपुर्व ,   न्यायालया तील प्रलंबित प्रकरणांचा समावेश वाशिम ,   दि. १५  :   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार शनिवार ,   २५ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत ,   असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा शं. सावंत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये धनादेश अना...

आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील क व ड गटातील पदांसाठी सुधारित आरक्षणास मंजुरी

Image
  आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील क व ड गटातील पदांसाठी सुधारित आरक्षणास मंजुरी अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड या 8 जिल्ह्यांमधील आरक्षण जिल्हा व प्रवर्गनिहाय पुढील प्रमाणे असेल: पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या 4 जिल्ह्यांमध्ये अनु.जाती 10 टक्के,अनु.जमाती 22 टक्के,विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 15 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के, यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के,अनु.जमाती 14 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 17 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 34 टक्के, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनु.जाती 13 टक्के,अनु.जमाती 15 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के,भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 19 ट...

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणार

Image
  मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवून, ओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या अधिनियमात सुधारणा करण्याचा ग्राम विकास विभागाने प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा होऊन मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अध्यादेशात करण्यात येणारी सुधारणा पुढीलप्रमाणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10, पोटकलम (2) चा खंड (ग) आणि कलम 30, पोटकलम (4) चा खंड (ब) आणि  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या  कलम 12, पोटकलम (2) चा खंड (ग), कलम 42, पोटकलम (4)चा खंड (ब), कलम 58, पोटकलम (1ब) चा खंड (क) आणि कलम 67, पोटकलम (5) चा खंड (ब) मध्ये  “नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ...