गोवर्धना येथे महिला समता सैनिक दलाची स्थापना
गोवर्धना येथे महिला समता सैनिक दलाची स्थापना रिसोड :-- दिनांक ११/१/२०२३( भारत कांबळे प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने. रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथे महिला समता सैनिक दलाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक तालुका अध्यक्ष शालिग्राम पठाडे होते तर प्रमुख मार्गदर्शक अश्विनकुमार खिल्लारे जिल्हा मेजर हे होते.प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.धम्मध्वजाला मानवंदना देवानंद वाकोडे यांच्या नेतृत्वात देण्यात आली. यावेळी देवानंद वाकोडे, यांनी समता सैनिक दल प्रत्येक गावात स्थापन होणे ही काळाची गरज आहे असे सांगितले,तर खिल्लारे यांनी समता सैनिक दलाची आवश्यकता समाजाचे संरक्षण करणे हेतु व समाजातील तरुणांनी व्यसनाधीन न बनता समता सैनिक दलामध्ये सामील होऊन समाजाचे संरक्षण करावे. महिलांनी सुद्धा स्वयंभु बनुन स्वतः चे व कुटुंबाचे प्रसंगी समाजकंटकांपासुन संरक्षण करावे. अध्यक्षिय भाषणात शालिग्राम पठाडे यांनी समता सैनिक दलाच...