स्त्रियांनी स्वाभिमानी बनून स्वतःचा विकास साधावा – वसुमना पंत मुख्यकार्यकारी अधिकारी
स्त्रियांनी स्वाभिमानी बनून स्वतःचा विकास साधावा – वसुमना पंत मुख्यकार्यकारी अधिकारी
वाशिम :- (युगनायक न्यूज नेटवर्क )स्त्रियांनी स्वाभिमानी बनून स्वतःचा विकास साधावा व त्यातून आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी वाशिम वसुमना पंत यांनी स्टेट बँक आरसेटी वाशिम येथे आयोजीत विभागीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
आरसेटीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रर्शिक्षनार्थीच्या विभागीय स्पर्धेचे आयोजन दिनाक 10 जानेवारी 2023 रोजी स्टेट बँक आरसेटी वाशिम येथे करण्यात आले होते.यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर , शेळीसंगोपण व उद्योजकता विकास याचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रर्शिक्षनार्थीनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमच्या उद्घाटक म्हणून जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी वाशिम वसुमना पंत ह्या होत्या. तर प्रमुख अथिती म्हणून किरण कोंबे, प्रकल्प संचालक जि.प.वाशिम, सुधीर खुजे DDM DRDA वाशिम,आशुतोष नाईक मुख्य प्रबंधक एस बी.आय. वाशिम ,संदीप ढाले DRDA इत्यादीची उपस्थिती होती.
यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री.रघुनाथ माने संचालक स्टेट बँक आरसेटी वाशिम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविका मधून सदर स्पर्धेची रूपरेषा स्पष्ट करून आरसेटी प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. त्यानंतर जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी वाशिम वसुमना पंत यांनी आपल्या भाषणातून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच आपण स्त्रिया असून येथे आल्यात त्यामुळे आपण सर्वच विजेते आहात, आपण अशीच धडपड करून जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
सदर स्पर्धेकरिता अकोला,अमरावती,बुलढाणा,यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील आरसेटी मधून प्रशिक्षण घेतलेल्या प्रर्शिक्षनार्थीनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेकरिता बाह्य परीक्षक म्हणून राजेंद्र यादव सांगली ,प्रदीप साळवे बीड, राणी मोरया, रेखा खंडाळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याता गुलाब साबळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्टेट बँक आरसेटी वाशिम च्या सर्व कार्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME