राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंती,विश्वगुरू स्वामी विवेकानंद जयंती व स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा ९ वा वर्धापनदिन साजराआत्मविश्वास... जीवन जगण्याची प्रेरणा :- सचिन बुरघाटे
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंती,विश्वगुरू स्वामी विवेकानंद जयंती व स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा ९ वा वर्धापनदिन साजरा
आत्मविश्वास... जीवन जगण्याची प्रेरणा :- सचिन बुरघाटे
वाशिम : - (युगनायक न्यूज नेटवर्क )दि.१० जानेवारी २०२३रोजी माझोड येथे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन द्वारा राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंती,विश्वगुरू स्वामी विवेकानंद जयंती तसेच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या ९ वर्धापनदियानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन २०१४ पासून अकोला जिल्ह्याच्यास ग्रामीण भागात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे,ग्रुपच्या यशस्वीतेचे ९ वर्धपूर्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.गजाननजी नारे (संचालक:-प्रभात किड्स,अकोला),उदघाटक म्हणून मा.श्री.केशवराव मेतकर(उपाध्यक्ष :- श्री.शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती),प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री.सचिन बुरघाटे(इंटरनॅशनल स्पिकर),प्रमुख अतिथी म्हणून मा.डॉ. विनीत हिंगणकर(संचालक:-ओझोन हॉस्पिटल,अकोला),मा.डॉ.अमोल रावनकार(संचालक:-रावनकार हॉस्पिटल,अकोला),मा.डॉ.प्रणय महल्ले(संचालक :-विठाई हॉस्पिटल,अकोला) उपस्थित होते.या कार्यक्रमात अस्पायर चे संचालक,इंटरनॅशनल स्पिकर सचिन बुरघाटे यांचे आत्मविश्वास.. जीवन जगण्याची प्रेरणा या विषयावर जाहीर व्याख्यान झाले.या विषयावर बोलताना सचिन सर यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य हेच आत्मविश्वासाचे मूर्तिमंत उदाहरण आहे,स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या आपल्या पूर्ण युववर्गाला दिशादर्शक आहेत.आजच्या युवकांनी राष्ट्रमाता माँसाहेब व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेऊन आपलं व्यक्तिमत्व व जीवन जगावं,जेणेकरून आपण उद्याचा सृजसनशील समाज निर्मान करू शकू असे प्रतिपादन सचिन सर यांनी केले तसेच डॉ.गजानन नारे,डॉ. विनीत हिंगणकर,मा.श्री.केशवराव मेतकर,डॉ. अमोल रावनकार, डॉ. प्रणय महल्ले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.सर्व मान्यवरमंडळींनी स्वामी विवेकानंद ग्रुप च्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले.
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन द्वारा दरवर्षी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ जयंती,विश्वगुरू स्वामी विवेकानंद जयंती तसेच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वर्धापनदिनामित्त स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार देण्यात येतो. पश्चिम विदर्भात शैक्षणिक/सामाजिक/कृषी/साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५ व्यक्ती/संस्था यांना दरवर्षी स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार:-२०२३
सौ मिनाक्षी दिनेश वडतकर (डायरेक्टर :- डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूट, औरंगाबाद)
जागर फाऊंडेशन, अकोला
मा.श्री.चंद्रकांत झटाले(प्रसिद्ध लेखक व पत्रकार)
मा.श्री उत्कर्ष जैन(संचालक :- उत्कर्ष इनोव्हेटिव्ह पर्यावरणपूरक शैक्षणिक साहित्य केंद्र, अकोला)
श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ सार्वजनिक वाचनालय शिर्ला (अंधारे) ता. पातूर जि. अकोला यांना देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत जिल्हास्तरीय सामान्य ज्ञानस्पर्धा:-२०२३ आयोजित करण्यात आली होती,यास्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील ३६० गावातील जवळपास १५००० च्यावर विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेच्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक बोलताना ग्रुपचे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांनी माझोड हे गाव पुस्तक गाव बनविण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले तसेच ग्रुपच्या ९ वर्षाच्या यशस्वी वाटचलीबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल मते-ताले व कु तन्वी खंडारे यांनी केले.तसेच प्रास्ताविक राजेश पाटिल ताले व आभारप्रदर्शन प्रतीक ताले यांनी केले. या कार्यक्रमासाठी अकोला जिल्हाभरातून विविध मान्यवरमंडळी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME