कोरोना योध्दे समुदाय आरोग्य अधिकारी यांचे आर्थिक शोषणामुळे बेमुदत कामबंद आंदोलन....
कोरोना योध्दे समुदाय आरोग्य अधिकारी यांचे आर्थिक शोषणामुळे बेमुदत कामबंद आंदोलन....
वाशिम. (युगनायक न्यूज नेटवर्क )महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना वाशिम जिल्हा च्या वतीने दि.10 जाने 2023 रोजी डॉ. सुहास कोरे जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम यांना महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना वाशिम च्या जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले त्यावेळी संघटनेचे वाशिम जिल्हा पदाधिकारी
डॅा. ज्ञानेश जाधव जिल्हाध्यक्ष वाशिम
डॅा. दशरथ वाकुडकर कोषाध्यक्ष वाशिम
डॅा. शरद खानझोडे जिल्हा सहसचिव वाशिम
डॅा. रविंद्र कव्हर तालुकाध्यक्ष वाशिम डॅा. स्वप्निल तापडीया डॅा. नितु मापारी
डॅा. पुजा गोटे डॅा. स्वप्नाली गोटे
उपस्थित होते या राज्यव्यापी कामबंद आंदोलनात संघटनेच्या प्रमुख मागणी म्हणजे शासन सेवेत कायम करून गट ब चा दर्जा देने, केंद्र शासन च्या मार्गदर्शक सूचनेनुसार 40,000- ₹ रकमेवर मानधनवाढ व अनुभव बोनस, मूळ वेतनाच्या 10%कामावर आधारित मोबदला, जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली करण्यास परवानगी, केंद्र शासना च्या सूचनेनुसार इंडिकेटर लागू करून 23 इंडिकेटर रद्द करून किंवा प्रति इंडिकेटर 1000₹ करावा, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पदोन्नती करणे Hard Area Allowance हे शासनाने निर्गमित केलेल्या सर्व उपकेंद्र ला देने TA, DA, आणि भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण देने. अश्या प्रकारच्या मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलन हे दि.16 जाने.2023रोजी एकदिवशीय असेल जर मागण्या मान्य करण्यात नाही आल्यातर दि 23 जाने.2023 पासुन बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना वाशिम जिल्हा कार्यकारिणी तसेच राज्याच्या वतीने देण्यात आला.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME