शिष्यवृत्ती परीक्षेत सिद्धीविनायक व वैष्णवीचे सुयश
शिष्यवृत्ती परीक्षेत सिद्धीविनायक व वैष्णवीचे सुयश
वाशिम : (युगनायक न्यूज नेटवर्क ) महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ ची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यामध्ये स्थानिक एस एम सी इंग्लिश स्कूल वाशीम च्या सिद्धिविनायक सुरेश भिसडे व वैष्णवी श्रीराम उखळे ने यश प्राप्त केले आहे. इयत्ता पाचवी चा विद्यार्थी सिद्धिविनायक भिसडे व इयत्ता आठवीची विद्यार्थीनी वैष्णवी उखळे यांनी नेत्रदीपक यश प्राप्त करून विशेष गुणवत्ता अहर्ता यादीत आपले स्थान निर्माण करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे .त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांंचे प्राचार्य मीना उबगडे यांनी कौतूक केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME