नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे नाशिकसह पुणे, अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार चालना : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे नाशिकसह पुणे, अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार चालना : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक संपन्न नाशिक दि.31 ( युगनायक न्युज नेटवर्क ) - नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असल्याने या शहरांच्या विकासात आर्थिक भर पाडणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व मान्यता मिळाल्या असून, या द्रृतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु करण्यात येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथिल मध्यवर्ती सभागृहात नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादना बाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे व्यवस्थपकीय संचालक सचिन कुलकर्णी, उपजिलहाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, नाशिक पुणे सेमी हास्पीड...