मुंबईतील सागरी प्रदूषण विषयावरील माहितीपटाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत प्रकाशन
मुंबईतील सागरी प्रदूषण विषयावरील माहितीपटाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत प्रकाशन
शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद दि. ३१ मे १८९३ रोजी मुंबई येथून जहाजाने रवाना झाले होते. या घटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत मुंबई व परिसरातील सागरी प्रदूषण या विषयावरील एका जनजागृतीपर मराठी माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन या संस्थेच्या प्रोजेक्ट ब्लू अंतर्गत या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती, आचार्य लोकेश मुनी, रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील स्वामी विद्यानाथानंद, भजन गायक अनुप जलोटा व विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक डॉ.राजेश सर्वज्ञ उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME