गोगलगायी मुळे कुंबेफळ येथील शेतकरी त्रस्त शासनाकडे नुकसान भरपाई ची मागणी....
गोगलगायी मुळे कुंबेफळ येथील शेतकरी त्रस्त शासनाकडे नुकसान भरपाई ची मागणी.... लोणार /लुकमान कुरेशी लोणार तालुक्यातील बिबी या गावाजवळील कुंबेफळ शिवारातील शेतीमध्ये गोगलगाय या सरपटणारे किड ने सोयाबीन,कपाशी व इतर पिकाची नुकसान होत आहे.त्यामुळे सदरील पिकाची शासनाकडून पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी याकरिता गावातील शेतकरयांनी सिंदखेडराजा येथे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देत त्याची प्रतिलिपी तहसीलदार,उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.कुंबेफळ या गावातील शेतशिवारामध्ये गोगलगाय या पासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासन दरबारी नुकसान भरपाईची अपेक्षा ठेवुन आहे. कुंबेफळ शिवारातील गट क्रमांक68,107,106,108,104,121,122,109,111या क्षेत्रावर पेरलेले सोयाबीन पीक गोगलगायीने पूर्ण उध्वस्त केले आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर माधवराव फड, रामराव फड,त्र्यंबक फड प्रशांत फड,साहेबराव फड, गणेश फड व इतर शेतकऱ्यांच्या सह्या असलेली निवेदन देण्यात आले आहे.