Posts

Showing posts from November, 2021

मातंग पँथर सेनाची दि १६ नोव्हेंबर २०२१ पासुन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका बॉडी व अहमदनगर जिल्ह्या व तालुका स्तरावरील संपुर्ण बॉडी बरखास्त

Image
मातंग पँथर सेनाची दि १६ नोव्हेंबर २०२१ पासुन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका बॉडी व अहमदनगर जिल्ह्या व तालुका स्तरावरील संपुर्ण बॉडी बरखास्त   औरंगाबाद -(युगनायक न्युज नेटवर्क) मातंग पँथर सेना ची दिनांक 16/11/2021 वार मंगळवार पासून जिल्हा जालना मधील तालुका भोकरदन व संपूर्ण अहमदनगर जिल्हा व तालुका बॉडी बरखास्त करण्यात आली आहे, कोणीही आपल्या पदाचा व संघटनेच्या नावाचा सिम्बॉल चा लेटर हेड चा वापर करू नये,जर गैरवापर केला आणि काही अनुचित प्रकार घडला याला सर्वस्व जबाबदार तो व्यक्ती असेल याची नोंद घ्यावी तसेच संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब गवळी जो व्यक्ती त्याचा गैरवापर करेल आशा व्यक्तीवर कायदेशीर दंडात्मक स्वरूपात कार्यवाही करतील याची ता भोकरदन जिल्हा जालना व संपूर्ण अहमदनगर जिल्हा मधील जे पदाधिकारी होते यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

नाशिक एस.टी. महामंडळ, नाशिक ह्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पूर्ण करून घेण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपास / आंदोलनास सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनव्ये जाहीर पाठिंबा

  नाशिक एस.टी. महामंडळ, नाशिक ह्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पूर्ण करून घेण्यासाठी  पुकारण्यात आलेल्या संपास / आंदोलनास सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनव्ये जाहीर पाठिंब नाशिक दिनांक 8/11/2021 रोजी नाशिक म.न.से. पदाधिकारी व मनसैनिक ह्यांनी नाशिक एस.टी. महामंडळ, नाशिक ह्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पूर्ण करून घेण्यासाठी  पुकारण्यात आलेल्या संपास / आंदोलनास सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनव्ये जाहीर पाठिंबा दिला. त्या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष ऍड. रतनकुमार इचम साहेब, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीपभाऊ दातीर, सभापती व मा. नगरसेवक योगेश भाऊ शेवरे तसेच विधी विभागाकडून प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुलजी तिडके, शहराध्यक्ष ऍड. महेंद्रजी डहाळे,शहर सचिव ऍड. शुभम जोशी तसेच इतर पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. - म.न.से. विधी विभाग नाशिक

मानवहीत लोकशाही पक्षाच्या कर्मचारी आघाडीच्या विदर्भ अध्यक्षपदी-श्री.वसंतराव जोगदंड.

Image
  मानवहीत लोकशाही पक्षाच्या कर्मचारी आघाडीच्या विदर्भ अध्यक्षपदी-श्री.वसंतराव जोगदंड.                           औरंगाबाद . युगनायक न्युज नेटवर्क    मानवहीत लोकशाही पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक दि.७/११/२०२१ रोज रविवारी औरंगाबाद येथे तिवारी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.बैठकिच्या अध्यक्षस्थानी मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचीनभाऊ साठे होते.प्रमुख उपस्थीती श्री.अशोकजी उफाडे प्रदेश अध्यक्ष,अनिलभाऊ सरोदे राष्ट्रीय उपाध्यक्ष,गणेभाऊ भगत राष्ट्रीय सचीव ,सौ.दिशाताई साठे,टी.एन.आन्ना कांबळे कोअर कमीटी सदस्य ,प्रा.संजयजी गायकवाड लसाकम अध्यक्ष महाराष्ट्र,श्री.भागवतराव डोंगरे मराठवाडा अध्यक्ष आदी उपस्थित होते.बैठकीमसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी , कार्यकर्ते हजर होते.प्रथम आन्नाभाऊ साठे व शंकरभाऊ साठे यांच्या मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीमध्ये अशोक उफाडे,प्रा.संजय गायकवाड ,टी.एम.काबळे ,भागवत डोंगरे, गणेश भगत,श्री.वसंतराव जोगदंड उपाध्यक्ष लसाकम वाशिम जिल्हा...

एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला वंचित बहूजन आघाडीचा पाठींबा

Image
  एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला वंचित बहूजन आघाडीचा पाठींब न्याय मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वाशिम   युगनायक न्युज नेटवर्क - विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला वंचित बहूजन आघाडीने आपला संपूर्ण पाठींबा दर्शविला असून कर्मचार्‍यांच्या न्याय मागण्या मान्य न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनात राज्य सदस्या सौ. किरणताई गिर्‍हे व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ८ नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचारी संघटनेला पाठींब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव सोनाजी इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव हिवराळे, तालुका अध्यक्ष नारायण खोडके, जिल्हा उपाध्यक्ष हरिदास बन्सोड, शहराध्यक्ष भूषण मोरे, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप सावळे, पुंजाजी खंडारे, निलेश भोजने, सुभाष अंभोरे, राजु दारोकार आदी उपस्थित होते.     यावेळी किरणताई गिर्‍हे म्हणाल्या की, राज्यात एस.टी. कर्मचार्‍यांनी त्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी ...