मानवहीत लोकशाही पक्षाच्या कर्मचारी आघाडीच्या विदर्भ अध्यक्षपदी-श्री.वसंतराव जोगदंड.
मानवहीत लोकशाही पक्षाच्या कर्मचारी आघाडीच्या विदर्भ अध्यक्षपदी-श्री.वसंतराव जोगदंड.
औरंगाबाद. युगनायक न्युज नेटवर्क मानवहीत लोकशाही पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक दि.७/११/२०२१ रोज रविवारी औरंगाबाद येथे तिवारी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.बैठकिच्या अध्यक्षस्थानी मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचीनभाऊ साठे होते.प्रमुख उपस्थीती श्री.अशोकजी उफाडे प्रदेश अध्यक्ष,अनिलभाऊ सरोदे राष्ट्रीय उपाध्यक्ष,गणेभाऊ भगत राष्ट्रीय सचीव ,सौ.दिशाताई साठे,टी.एन.आन्ना कांबळे कोअर कमीटी सदस्य ,प्रा.संजयजी गायकवाड लसाकम अध्यक्ष महाराष्ट्र,श्री.भागवतराव डोंगरे मराठवाडा अध्यक्ष आदी उपस्थित होते.बैठकीमसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी , कार्यकर्ते हजर होते.प्रथम आन्नाभाऊ साठे व शंकरभाऊ साठे यांच्या मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीमध्ये अशोक उफाडे,प्रा.संजय गायकवाड ,टी.एम.काबळे ,भागवत डोंगरे, गणेश भगत,श्री.वसंतराव जोगदंड उपाध्यक्ष लसाकम वाशिम जिल्हा आदींनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, येणार्या भविष्यकाळात जो पक्ष मानवहीत लोकशाही पक्षाचे ध्येय धोरणे समजुन घेवुन पक्षाला सन्मानपुर्वक सत्तेतील सहभाग, तसेच अन्नाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सिफारशि लागु करणे, मातंग समाजाच्या विकासाचे आन्नाभाऊ साठे विकास महामंडळाचे सशक्तीकरण करणे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब,क,ड,आरक्षण लागू करणे,राज्यातील प्रत्येक महामंडळे,विभागीय विकास मंडळे, तालुका, जिल्हा स्तरावरील समीत्यामध्ये मानवहीत लोकशाही पक्षाला जो पक्ष सन्मानपुर्वक सत्तेतील सहभाग देणार त्याच पक्षासोबत मानवहीत लोकशाही पक्ष युती करेल आदि विषयांवर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सचीनभाऊ साठे आपले समारोपीय विचार मांडताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाने राजकीय जमात निर्माण करण्यासाठी एकसंघपणे संघटीत होऊन अस्तीत्वाच्या लढाईसाठी माहीत लोकशाही पक्षाचे पाठीशि खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत आपला पक्ष निश्चीतपणे सत्तेतील वाटा, समाजाला अस्तीत्व, विकासाचे दरवाजे खुले करुन दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसलल्याचे देखील सांगीतले, कार्यक्रमामध्ये पक्ष वाढीसाठी व बळकटी साठी राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातील लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री वसंतराव जोगदंड सर ह्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री वसंतराव जोगदंड सर ह्यांची नियुक्ती "मानवहीत लोकशाही पक्षाचे कर्मचारी आघाडीचे विदर्भ अध्यक्ष"म्हणून निवड करण्यात आली.कार्यक्रमामध्ये मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचीनभाऊ साठे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पक्ष वाढीसाठी शुभेच्छा दिल्या व श्री वसंतराव जोगदंड सर ह्यांचे नियूक्तीमुळे विदर्भातील कर्मचारी सक्षमपणे पक्षासाठी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास निर्माण करुन भविष्यकाळातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी वाशिम जिल्ह्यातील जिल्ह्यध्यक्ष प्रल्हाद लगड, भारत अंभोरे, गजानन डोंगरे,साहील साठे, प्रल्हाद डोंगरे,व राज्यातील प्रा.संजयजी गायकवाड लसाकम अध्यक्ष महाराष्ट्र,पी.के.काबळे लातुर, बबनराव शिखरे माजी.नगराध्यक्ष हिंगोली, रमेश सुर्यवंशी औरंगाबाद, संदीप खंदारे अकोला, बालाजी घुमाडे पुणे, सुरेश थोरात पुणे,सुरज साठे वाटेगाव,सौ.सरीताताई आवळे सातारा, सौ.दिशाताई सचीन साठे, मुकेश गवई बुलढाणा, प्रदीप खंदारे हिंगोली,मालोजी वाघमारे नांदेड,सुदामा डोके मुंबई, अनंता साठे नाशिक, रामप्रसाद कसाब जालणा, मिलींद वाघमारे परभणी आदी महाराष्टातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश सुर्यवंशी औरंगाबाद यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री भागवत डोंगरे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्टगिताने झाली.सदर माहीती आमचे प्रतीनीधीला श्री वसंतराव जोगदंड सर हराळ वाशिम यांनी दिली.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME