एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनाला वंचित बहूजन आघाडीचा पाठींबा
एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनाला वंचित बहूजन आघाडीचा पाठींब
न्याय मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाशिम युगनायक न्युज नेटवर्क- विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनाला वंचित बहूजन आघाडीने आपला संपूर्ण पाठींबा दर्शविला असून कर्मचार्यांच्या न्याय मागण्या मान्य न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनात राज्य सदस्या सौ. किरणताई गिर्हे व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत ८ नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचारी संघटनेला पाठींब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव सोनाजी इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव हिवराळे, तालुका अध्यक्ष नारायण खोडके, जिल्हा उपाध्यक्ष हरिदास बन्सोड, शहराध्यक्ष भूषण मोरे, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप सावळे, पुंजाजी खंडारे, निलेश भोजने, सुभाष अंभोरे, राजु दारोकार आदी उपस्थित होते.
यावेळी किरणताई गिर्हे म्हणाल्या की, राज्यात एस.टी. कर्मचार्यांनी त्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. अनेक ठिकाणी एस. टी. कर्मचार्यांनी राज्यशासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागुन स्वतःचे जीवन संपविले आहे. राज्यशासन व विरोधी पक्ष हे मात्र एस.टी कर्मचार्यांच्या जिवाशी खेळत असुन आपआपली राजकीय पोळी भाजुन घेत असुन त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत. मागील ५ वर्ष सत्तेत असतांना युती शासनाने एस. टी. कर्मचार्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्याचप्रमाणे आताच्या आघाडी शासनाने कामगाराच्या प्रश्नांपासुन पळ काढलेला आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या तसेच नोकरीवरुन निष्काशित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कर्मच्यार्यांच्या न्यायहक्काची पायमल्ली केली जात आहे. वेळोवेळी कर्मचार्यांचा मानसिक, शारिरीक आणि आर्थिक छळ करण्यात येत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातुन वंचित बहुजन आघाडी सदैव कर्मचार्यांच्या पाठीशी उभी आहे. वंचित बहुजन आघाडी जिल्हयाच्या वतीने एस. टी. कामगारांच्या आंदोलनाला संपुर्ण पाठींबा आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी तातडीने न्याय मागण्या मान्य कराव्या व एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करुन कामगारांना शासन नियमाप्रमाणे सर्व सोईसवलती देण्यात याव्या. अन्यथा वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळया स्वरुपाचे तिव्र आंदोलन छेडेल असे यावेळी सौ. गिर्हे म्हणाल्या.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME