Posts

Showing posts from October, 2021

डॉ . बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेकडून विदर्भभुषण पुरस्काराची घोषणा

Image
 डॉ . बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेकडून विदर्भभुषण पुरस्काराची घोषणा    वाशिम  (युगनायक न्युज नेटवर्क) : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या वाशिमच् जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांना यंदाचा विदर्भभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था तोंडगाव ता . जि वाशिम यांच्या वतीने सामाजिक जाणिवेतून निस्वार्थी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे . या वर्षीचा विदर्भ भुषण पुरस्कार ( २०२१-२२ ) प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कु . प्रियांका हरीश्चंद्र गवळी ( जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वाशिम याना विदर्भ भुषण पुरस्काराने दि . २८/१०/२०२१ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.कोरोणाकाळात प्रशासनात राहुन प्रेरणादायी कार्य तसेच सामाजिक दायित्वाची जाण ठेवुन तळागाळातील लोकांसाठी सदैव झटुन अनेकांना कोरोणाकाळात मदतीचा हात देवुन लोकहिताचे ऊपक्रम राबवले . कोविड -१ ९ चा सामना करण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करुन लसिकरणासाठी पुढाकार घेतला . लोकांना कोरोना प्रतिबंधक लसिकरनाचे महत्व पटवुन देवुन लसिकरण आकडेवारी वाढवण्यासा...
  वाशिम दि .२० जानेवारी २०२२ गुरुवार अंक- २० वर्ष- ०५    एकुण पान -४  खंड -५  किंमत - ५ ₹ वाशिम  जिल्हा वृत्त विशेष रिसोड   केशव नगर पुणे   पर्यंत नाव  कार्यकारी संपादक - सुरेश ज. अंभोरे  मो. नं. 7507632358 युगनायक न्युज नेटवर्क पद :- कालावधी :- मो.नं. मु +पोस्ट :- रिठद  ता. रिसोड जिल्हा. वाशिम 444510  महाराष्ट्र राज्य  ओळखपत्र क्रं.2018-244358 जितेश शेषराव गायकवाड [16/01, 9:20 pm] Jitesh Gaykwad Rtd: परी गृहउद्योग अंश  अक्वा अँड डिश फिटिंग रिठद [16/01, 9:20 pm] Jitesh Gaykwad Rtd: मो नं 9604166435 कार्यकारी संपादक संपन्न  वाशिम तालुका प्रतिनिधी मुख्यकार्यालय :- दैनिक संवाद युगणायकांचा (अध्यक्ष- अॅड.भारत द. गवळी) युग गुरु बहु. शिक्षण संस्था, रिठद ता. रिसोड जिल्हा. वाशिम  444510 महाराष्ट्र राज्य ध2नेश दत्तराव गवळी प्रबुद्ध समाज निर्माण संस्था ,औरंगाबाद  ज्ञानपर्व पब्लिकेशन, रिठद ता. रिसोड जिल्हा वाशिम महाराष्ट्र डॉ बाबासाहेब आंबेडकर   फौंडेशन , मायनॉरिटी  अँड रिसर्च सेंटर ,र...

विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

Image
  विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे परळी (दि. 04) -: कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री श्री.मुंडे यांनी 'वेलकम बॅक टू स्कूल...' म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात 'थँक यू सर...' म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर, आता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजवण्याचा निर्णय घेतला असून राज्यात शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा, टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा, अशा शुभेच्छा दिल्या. पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत, त्या आता कायम...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे कोविड आढावा बैठक संपन्न

Image
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे कोविड आढावा बैठक संपन्न महिलांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे निर्देश सातारा दि.४  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, विकासकामे आणि अतिवृष्टीबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेऊन श्री. पवार म्हणाले, कोविडसाठी निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा पुढील काळासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पासारख्या सुविधांच्या देखभालीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे.  आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात. राज्यात काही ठिकाणी...

वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश रेखाताई ठाकुर यांची किरणताई गिर्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Image
  वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश रेखाताई ठाकुर यांची किरणताई गिर्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट                                       वाशिम    दि.०३ वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांच्या अकोला नांदेड दौऱ्यादरम्यान वाशिम मध्ये  प्रदेश  महिला सदस्या किरणताई गिर्हे  यांच्या "समीकरण "  या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान आगामी पक्षाच्या ध्येय धोरण व पक्षा संबधीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली यावेळी गिर्हे व भांदुर्गे परिवार  तर्फे रेखारताईचे स्वागत करण्यात आले

महाराष्ट्रातील स्टार्टअप्स व फ्रान्सच्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल क्रांती घडेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Image
  महाराष्ट्रातील स्टार्टअप्स व फ्रान्सच्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल क्रांती घडेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबई, दि. 30 : माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. आगामी काळात फ्रान्ससारख्या देशांकडून तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास राज्यात डिजिटल क्रांती घडेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. इंडो-फ्रान्स चेंबर्स ऑफ कॉमर्सची 44 वी सर्वसाधारण सभा मुंबईतील हॉटेल ताज येथे पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. देसाई बोलत होते. यावेळी चेंबर्सच्या अध्यक्षपदी सुमीत आनंद यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल श्री.देसाई यांनी आनंद यांचे अभिनंदन केले. उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, फ्रान्समधील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात स्थायिक असून देशाच्या व राज्याच्या औद्योगिक प्रगतीला हातभार लावत आहेत. कोविड काळात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फ्रान्समधील कंपन्यांनी मोलाचा वाटा उचलला. सध्या माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप्सचे हब म्हणून महाराष्ट्र नावारुपास येत आहे. फ्रान्समधील तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर पोहोच...

मिस युनिव्हर्स टूरिझम श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

Image
    मिस युनिव्हर्स टूरिझम श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट मुंबई, दि. ३० : मिस युनिव्हर्स टूरिझम आणि मिस एशिया विजेत्या श्रिया परब यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांचे ही स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनिल प्रभू, शिवानी परब, संजय परब, आदित्य परब, ऋषिकेश मिराजकर उपस्थित होते. श्रिया परब यांनी राज्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाला सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर चर्चासत्र

Image
  ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर चर्चासत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन मुंबई,दि. 30 : येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे  1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता 'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे कार्यक्रम आयोजित केला आहे.   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, मुंबईच्या महापौर सौ.किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन माळी, समाज कल्याण आयुक्त पुणे डॉ.प्रशांत नारनवरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे. 'समृद्ध वृद्धापकाळ' या विषयावर या कार्यक्रमात चर्चासत्र आयोजित केलेले आहे. संचालक हेल्पेज इंडियाचे ...

वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Image
  वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई, दि. 30 - अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि प्रदूषण कमी करणे यावर राज्य शासनाचा भर असून वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने शासनाने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीस सुरूवात केली असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले. वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आणि स्वीडन दरम्यान सह्याद्री अतिथीगृह येथे शाश्वतता पुढाकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस स्वीडनच्या मुंबईतील महावाणिज्यदूत एना लेकवल, वाणिज्य दूत एरीक माल्मबर्ग, राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी उपस्थित होते. पर्यावरण म...

समाजात सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात अधिकाधिक योगदान द्यावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Image
  समाजात सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात अधिकाधिक योगदान द्यावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ,   विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ,   आमदार नाना पटोले पुरस्काराने सन्मानित मुंबई, दि. 30 : समाजात परिवर्तन अनेक लोकांच्या सामूहिक प्रयत्नातून घडत असते. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील अग्रणी लोकांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन योगदान देणे आवश्यक असते. विविध क्षेत्रातील चॅम्पियन्स समाजासाठी प्रेरणास्रोत असून त्यांनी आपापल्या क्षेत्रांत अधिकाधिक योगदान दिल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन निश्चितपणे येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांसह ३५ जणांना उल्लेखनीय कार्यासाठी चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. श्री. फडणवीस यांच्या वतीने माजी आमदार राज पुरोहित यांनी पुरस्कार स्व...

उद्ध्वस्त झालेल्यांचा आधार व्हा – पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

Image
  उद्ध्वस्त झालेल्यांचा आधार व्हा – पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन अमरावती, दि. 30 : राज्यातील जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सौहार्दाची, आपुलकीची आणि न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त झालेल्या लोकांचा आधार होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.   अमरावती येथील महिला प्रबोधिनी येथे महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महिला आणि बालविकास विभागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या  अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच  राज्यातील नव्याने रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांचं वर्तन जनतेप्रति कसे मुजोरपणाचे होते याचा किस्सा सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना वेळीच प्रशिक्षण मिळालं नाही तर त्यांची वागणूक कशी होते याचे उदाहरण दिले.   त्यामुळे संघर्ष करून आ...

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत; धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द

Image
  वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत; धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द मुंबई, दि. 30 : मोफत कोविड लसीकरणासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री आणि अजंता फार्माचे व्हाईस चेअरमन मधुसुदन अग्रवाल यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपुर्द केला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, वर्ल्ड ट्रेड सेंटर चे व्हाईस चेअरमन शरद उपासणी आणि अजय रुईया तसेच अजंता फार्मा चे व्यवस्थापकीय संचालक योगेश अग्रवाल उपस्थित होते. राज्यात सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेला बळ देण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एमव्हीआयआरडी सेंटर मार्फत 1 कोटी आणि अजंता फार्माच्या वतीने 1 कोटी इतका निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे.

औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनस उपलब्ध करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
  औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनस उपलब्ध करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणे, दि.३०(जिमाका): नवी मुंबई आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनस उपलब्ध करून द्यावेत. वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश देतानाच महिलांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले.   बेलापूर येथील सिडको भवन सभागृहात आज उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसी आणि कायदा सुव्यवस्था विषयक समस्या ऐकून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्री. शशिकांत शिंदे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलीकनेर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जेथे पाऊस जास्त पडतो तेथे  डांबरी रस्त्याऐवजी सिमेंट काँक्रिटचे करावेत. जेणेकरून खड्ड्यांची समस्या जाणवणार नाही. औद्योगिक वसाहतींमध्ये पार्किंग, र...

नारायण इंगळे अनाथ आरक्षण संवर्गातून पहिला अधिकारी

Image
  नारायण इंगळे अनाथ आरक्षण संवर्गातून पहिला अधिकारी मुंबई दि.30 : राज्यसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत अनाथ संवर्गातील आरक्षणातून नारायण इंगळे या तरुणाला प्रादेशिक वन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अनाथ संवर्गातील आरक्षणातून अधिकारी झालेला नारायण इंगळे हा पहिला असून त्याला शुभेच्छा देत त्याचे मी खूप खूप अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया  महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण देण्यात यावे यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता. या आरक्षणाद्वारे नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वन अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. याबाबत नारायणशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महिला व बालविकास मंत्री ॲङ  ठाकूर यांनी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही आपण कायम सोबत असल्याची ग्वाही त्यांनी नारायण याला दिली.  यापुढे होतकरू अनाथ बालकांना आरक्षणाद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होईल असा विश्वास ॲङ ठाकूर यांनी यावेळी व...