‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर चर्चासत्र
‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर चर्चासत्र
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई,दि. 30 : येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता 'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, मुंबईच्या महापौर सौ.किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन माळी, समाज कल्याण आयुक्त पुणे डॉ.प्रशांत नारनवरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे.
'समृद्ध वृद्धापकाळ' या विषयावर या कार्यक्रमात चर्चासत्र आयोजित केलेले आहे. संचालक हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावंकर, मुंबईच्या माजी महापौर सौ.निर्मला सावंत प्रभावळकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळ हे या चर्चासत्रातील प्रमुख सहभागी वक्ते आहेत, अशी माहिती समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME