मिस युनिव्हर्स टूरिझम श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

  मिस युनिव्हर्स टूरिझम श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट






मुंबई, दि. ३० : मिस युनिव्हर्स टूरिझम आणि मिस एशिया विजेत्या श्रिया परब यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांचे ही स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनिल प्रभू, शिवानी परब, संजय परब, आदित्य परब, ऋषिकेश मिराजकर उपस्थित होते.

श्रिया परब यांनी राज्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाला सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.








Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

ग्रामीण उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या – कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता