जिल्ह्यातील कुमारी मातांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करा – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
जिल्ह्यातील कुमारी मातांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करा – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात झरीजामणी, पांढरकवडा, मारेगाव तसेच इतर आदिवासीबहुल भागातील कुमारी मातांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या महिलांना विविध योजनेतून लाभ देऊन सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालभवन तसेच कुमारी मातांच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, मुंबई बाजार समितीचे अ...