शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज ‘महाडीबीटी’ पोर्टलवर सादर करण्याचे आवाहन

 शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज
महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्याचे आवाहन



वाशिम, दि. १७ (जिमाका) :  सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in हे पोर्टल माहिती व तंत्रज्ञाना यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जातीविजाभजइमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांकरिता नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची कार्यवाही ३ डिसेंबर २०२० पासून सुरु करण्यात आली आहे.
सन २०२०-२१ मधील अनुसूचित जातीविजाभजइमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in यासंकेतस्थळावरील नोटीस विभागामध्ये देण्यात आलेल्या कालावधीनुसार भरून घ्यावे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलला फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनांचे अर्ज भरण्यासाठी आपल्या स्तरावरून आवाहन करावे. तसेच सन २०१९-२० मधील अनुसूचित जातीविजाभजइमाव विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या बाकी राहिलेल्या अर्जांवर दिलेल्या वेळेत तत्काळ कार्यवाही करून घ्यावी.
जिल्ह्यातील सर्व प्राचार्य यांनी सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याबाबत अवगत करावे. तसेच https://dbtworkflow.mahaonline.gov.in या पडताळणी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांसाठी प्राप्त झालेले अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संकेतस्थळावर दिलेल्या कालावधीमध्ये सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयवाशिम यांच्याकडे पाठवावेतअसे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू