महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ या विषयावर आज सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ या विषयावर आज सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली, दि. २० : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेत’ २२ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने परिचय केंद्राने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे’ आयोजन केले आहे. व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी श्री.शेखर गायकवाड हे ‘महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ या विषयावर २२ मार्च २०२१ रोजी दुपारी २ वाजता आपले विचार मांडणार आहेत.
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राने विविध क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून दिल्ली येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे हे हीरक वर्ष आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
शेखर गायकवाड यांच्याविषयी
श्री.शेखर गायकवाड यांनी कृषी विषयात एम.एस.सी, समाजशास्त्र आणि तत्वज्ञान विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली तसेच एल.एल.बी ची पदवीही संपादन केली आहे. १९८७ मध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर त्यांनी शासनाच्या विविध महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला. २०१३ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, २०१५ मध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी, यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असून सद्या राज्याचे साखर आयुक्त म्हणून श्री.गायकवाड कार्यरत आहेत.
श्री.गायकवाड यांनी विविध विषयांवर लिखाण केले आहे. यात महाराष्ट्रातील भुजलावरील ‘महाराष्ट्राची भूजलगाथा’ हे पुस्तक, ‘एफ आर. पी’ ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माहितीपुस्तिका, बियाँड कॉम्पीटीशन हे कायदेविषक इंग्रजी कथा आदी, फेरफार नोंदी, शेतीचे कायदे आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. श्री.गायकवाड यांना उल्लेख्खनीय कार्यासाठी केंद्र सरकारचा जल पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक वाङ्मय पुरस्कार, स्व.सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सोमवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार
सोमवारी 22 मार्च 2021 रोजी दुपारी 2 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युट्यूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मीडिया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME