गुणवंत खेळाडूंसाठी पेंशन योजना

 गुणवंत खेळाडूंसाठी पेंशन योजना
वाशिम, दि. १७ (युगनायक न्युज नेटवर्क) :  भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे ७ जून २०१८ रोजीच्या  निर्णयानुसार गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पुर्ववत करणेसक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे. त्यानुसार गुणवंत खेळाडूंना पेंशन मिळणार आहे.
ऑलिम्पिककॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेच्या निकष क्र. ६ अन्वये सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिकपॅराऑलिम्पिक गेम्सकॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्णरौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे.  या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त गुणवंत खेळाडूस मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच पेंशन ३० वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडापासून सेवानिवृत्तीची तारीखजे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि खेळाडूच्या आयुष्यादरम्यान कायम राहील. परंतु अशी पेंशन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या विश्वचषक, विश्व अजिंक्यपद स्पर्धांकरीता सदरची योजना लागू राहील. याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असूनविहीत नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष तथा सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव तथा आयुक्तक्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावायाचा आहे.  याबाबत अधिक माहिती https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons या लिंकवर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
असे राहणार दरमहा पेंशन
ऑलिम्पिक / पॅराऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक -  दरमहा २०,००० रुपयेसुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) – १६,००० रुपयेरौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) – १४,००० रुपयेसुवर्ण पदक-कॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्सपॅरा एशियन गेम्स - १४,००० रुपयेरौप्य व कास्य पदक-कॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्सपॅरा एशियन गेम्स – १२,००० रुपये.



Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू