‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत
‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. २० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कशी ओळखाल खाद्यपदार्थांची भेसळ’ या विषयावर अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दिनांक २१ व सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवर याच वेळेत ही मुलाखत ऐकता येईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत भेसळयुक्त अन्न पदार्थांवर प्रशासनाकडून केली जाणारी कारवाई, त्यासाठी उपलब्ध असलेली फूड टेस्टिंग लॅब, भेसळयुक्त पदार्थांबद्दल नागरिकांनी कोठे तक्रार करावी, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना, सीलबंद पदार्थांवर विभाग कशाप्रकारे लक्ष देऊन आहे अशा, विविध मुद्यांवर सविस्तर माहिती अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME