लोणार तालुक्यातछ भाजपच्या किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी
लोणार तालुक्यातछ भाजपच्या किरीट सोमय्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी
लोणार. प्रा लुकमान कुरैशी
लोणार दि ७ शहरात आज शिवसेनेच्या वतीने भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विक्रांत घोटाळा प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली येथील विनायक चौकात आज दुपारी हा कार्यक्रम झाला. विक्रांत घोटाळा चौकशी झालीच पाहिजे,किरीट सोमय्या हाय हाय,शिवसेना झिंदाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांनी अक्रमत भुमिकेत जोर जोराने घोषणाबाजी केली या वेळी कु.उ.बा.समितीचे माजी सभापती सुनिल पाटील सुलताने शिवसेना उपतालुखा प्रमुख भगवान पाटील सुलताने,संतोष आघाव, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे,नगरसेवक डॉ.अनिल माघारी,युवासेना तालुका अध्यक्ष गजानन मापारी,गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी,नगरसेवक छगन कंकाळ,धरमचंद लुनिया, प्रमोद मापारी,माजी नगराध्यक्ष बाबुसिंग जाधव. विभाग प्रमुख विठ्ठल घायाळ, माजी शहरप्रमुख अशोक वारे. राहुल मापारी, पुरुषोत्तम केंद्रे,सुनील मापारी सह सैकड़ों शिवसैनिक हजर होते.यानंतर किरीट सोमय्या यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करुन तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी. प्रभारी तहसीलदार गायकवाड मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME