किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज चा विद्यार्थी अजय रोहिदास चव्हाण चे सुयश
किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज चा विद्यार्थी अजय रोहिदास चव्हाण चे सुयश
लोणार. प्रा लुकमान कुरैशी
हरियाना राज्यातील रोहतक येथे झालेल्या 8 व्या स्टुडंट ऑलम्पिक असोशिएशन नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अंडर 19 मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले • या संघात वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज किनगाव जट्टू चा विद्यार्थी अजय रोहिदास चव्हाण याने चमकदार कामगिरी बजावली
अजय चव्हाण हा विध्यार्थी देवानगर सारख्या छोट्याश्या गावा तुन आलेला आहे वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज चा विद्यार्थी असून नुकत्याच रोहतक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात त्याने चमकदार कामगिरी केली • महाराष्ट्र संघाने 19 वर्षाखालील गटात सिल्व्हर आणि 25 वर्षाखालील गटात ब्राँझ मेडल प्राप्त केले • संघा सोबत महाराष्ट्रा चे महासचिव सुनील शिंदे राहुल पेंढारकर अमरावती बुलडाणा जिल्ह्याचे अध्यक्ष जितू अडेलकर आणि संघा चे मार्गदर्शक धनराज राठोड सहभागी होते अजय चव्हाण च्या चमकदार कामगिरी बाबत वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज किनगाव जट्टू येथे मुख्याध्यापक डॉ.जी.एस.आडे हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी शिक्षक आर.जी.नागरे,आर.एम. राठोड,जे.आर.चव्हाण,जाधव सर,आर.चव्हाण,डी. चव्हाण,गायकवाड,व्ही. एस.आडे आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME