लोणार तालुक्यातील वृक्ष तोड थांबविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे तहसिलदार यांना निवेदन
लोणार तालुक्यातील वृक्ष तोड थांबविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे तहसिलदार यांना निवेदन
लोणार. /- प्रा लुकमान कुरैशी
लोणार तालुक्यातील वृक्षतोड थांबवण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक जावळे यांच्या नेतृत्वात आज 5 एप्रिल रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
लोणार तालुक्यात अतोनात वृक्ष तोड होत आसल्याने नैसर्गिक वातवरण दुशित होत आसुन प्राणी , पशु - पक्षी , मानवाच्या जिवनावर याचा वाईट परिणाम होत आहे . वातावरण जास्त तापायला लागले आहे.पर्यावरणाचे संतुलन बिगडत चालले आहे फळ झाडे आयुर्वेदिक झाडे इतर मौलवान झाडांची खुले आम तोड होत आहे.हा प्रकार थाबविण्यात येवुन पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत करावी.आणि सजिवांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार थाबवावा . अन्यथा रिपब्लीकन सेना लोणार तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी दिलीप पंडागळे, सागर पनाड,कुलदीप जावळे, जीवन अंभोरे,उकंडा जावळे, प्रशिक मोरे,सुरेश मोरे सह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME